पुणे

पुणे महापालिका देईना औद्योगिक जमिनींची माहिती

CD

पुणे, ता. १५ : कमाल जमीन धारणा कायद्यातील (युएलसी) कलम २० अंतर्गत सूट दिलेल्या जमिनींचा झोन बदल करून आतापर्यंत किती बांधकामांना परवानगी दिली, यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने मागितलेली माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेने सादर केली. मात्र, पुणे महापालिकेने सादर केली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन महापालिकेवर कारवाईचा बडगा उभारणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कलम २० खाली सूट दिलेल्या एक हजार जागा औद्योगिक वापरासाठी सरकारने दिल्या होत्या. १९९७ मध्ये या जागांचा झोन बदल करून त्यांचा निवासी वापर करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. मात्र, त्यापोटी जमिनींच्या रेडी-रेकनरमधील जागेच्या १५ टक्के हस्तांतर शुल्क हे राज्य सरकारकडे जमा करणे बंधनकारक केले आहे. हे शुल्क भरल्यानंतर जमिनींचा झोन बदल करण्याचे शुल्क भरून निवासी वापर करणे अपेक्षित आहे. अशा भूखंडांवर बांधकामांना परवानगी देताना असे शुल्क भरले आहे की नाही, याची तपासणी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. त्यासाठी पुणे आणि पिंपरी महापालिकेकडून या संदर्भातील माहिती मागविली आहे. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर पिंपरी महापालिकेने या संदर्भातील माहिती जिल्हा प्रशासनाला दिली. मात्र, पुणे महापालिकेने माहिती दिली नाही. वारंवार मागणी करूनही पुणे महापालिका सहकार्य करीत नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा उभारण्याची शक्यता जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व्यक्त करण्यात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panhala ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद, चक्कर आलेल्या रुग्णावरही उपचार होईना; धक्कादायक VIDEO VIRAL

Parli bypass traffic news: परळी बायपास रविवारीपासून बंद; रेल्वे रुळ व पुलाच्या कामामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण

Crime News: शिक्षकाचं दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य, अंगावर झोपून अश्लील चाळे अन्...; घटनेनं रायगड हादरलं

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

Dharur water crisis news: सहा पाणी योजना असूनही धारूरकरांना पाण्यासाठी भटकंती; वीस दिवसांपासून पुरवठा खंडित, ७५ वर्षांच्या आजीचा संघर्ष

SCROLL FOR NEXT