पुणे

वानखेडेंबाबतच्या विधानांबाबत मलिक यांच्याकडून समर्थन

CD

मुंबई, ता. २१ : न्यायालयात हमी देऊनही एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबत विधाने केल्याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समर्थन केले. वानखेडे यांच्या माध्यमातून केंद्रीय तपास यंत्रणेच्या दबावतंत्रावर बोलण्याचा आपला अधिकार अबाधित आहे, असा दावा आज मलिक यांनी केला.

वानखेडे यांच्या वडिलांनी उच्च न्यायालयात मलिक यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या खटल्याचा निकाल लागेपर्यंत वानखेडे कुटुंबियांबाबत विधाने करणार नाही, अशी हमी न्यायालयात मलिक यांनी दिली. असे असतानाही पत्रकार परिषदेत मलिक यांनी काही वादग्रस्त विधाने केली होती. याबाबत न्या. शाहरुख काथावाला आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने खुलासा करण्याचे निर्देश दिले होते. आज मलिक न्यायालयात सुनावणीसाठी हजर होते आणि त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले.

वानखेडे यांच्यामार्फत केंद्रीय तपास यंत्रणेच्या दबावतंत्रावर बोलण्याचा माझा अधिकार अबाधित आहे, असा दावा त्यांच्या वतीने करण्यात आला; मात्र खंडपीठाने याबाबत असमाधान व्यक्त केले. वानखेडे यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वानखेडे यांची मानहानी करू नये, अशी सूचना खंडपीठाने केली आणि सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत तहकूब केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ना तारण, ना जामीनदार द्यावा लागणार, तरी बॅंकेतून मिळणार २५ लाखांपर्यंत कर्ज, कोणती आहे योजना? वाचा...

सोलापुरात कांद्याच्या भावात २५० रुपयांची घसरण! तीन दिवसांत १२४५ गाड्या आवक; आता प्रतिक्विंटल १२५० ते ३३०० रुपयांपर्यंत दर

मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या किडनी विक्रीतील एजंट सोलापूरचा; मोबाईल लोकेशनवरुन कृष्णा सोलापुरात पकडला; अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या कृष्णाने नावापुढे लावली डॉक्टरची पदवी

Morning Breakfast Recipe: नेहमीचेच पोहे बनवण्यापेक्षा, एकदा असेही बनवून पाहा, सर्वजण करतील कौतुक, लेगच लिहून घ्या रेसिपी

त्वचेचे आजार व आतड्यांचे आरोग्य

SCROLL FOR NEXT