पुणे

हृदयविकारावर उपचारांसाठी नवे यंत्रौ

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २० : भायखळ्यातील जे.जे. समूह रुग्णालयात हृदयविकाराच्या उपचारांसाठी नवे यंत्र दाखल झाले आहे. हे यंत्र बायपास शस्त्रक्रियेसाठी खास वापरले जाणार आहे. आय. बी. पी. असे या यंत्राचे नाव असून ओएनजीसी कंपनीच्या सीएसआर फंडातून ३३ लाखांचे हे यंत्र रोटरी क्लब ऑफ मुंबईच्या वतीने जे.जे. रुग्णालयाला देण्यात आले आहे.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे, प्राध्यापक डॉ. मनोज जोशी, समाजसेवक दत्तात्रय विभुते यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. १८) या यंत्राचे अनावरण केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ मुंबईचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र अग्रवाल, ओएनजीसीचे अधिकारी किरण निकम उपस्थित होते.
जे.जे. समूह रुग्णालयात राज्य, तसेच देशभरातून उपचारांसाठी लाखो रुग्ण येत असतात. हृदयविकारावर बायपास शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात १० लाखांचा दर आकारला जातो. मात्र जे.जे. रुग्णालयात ही शस्त्रक्रिया माफक दरात उपलब्ध होईल, अशी माहिती जे.जे. रुग्णालय प्रशासनाने दिली.

बासपास शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या यंत्रामुळे गरजू रुग्णांना मदत होणार आहे. रुग्णालयात दरवर्षी हजारहून अधिक गरजू रुग्णांच्या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातील.
- डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जे.जे. समूह रुग्णालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT