Deepak Rao and Yogendra Singh
Deepak Rao and Yogendra Singh Sakal
पुणे

सीसीटीव्हीवर नजर ठेवणारे ‘पिव्होटचेन’ स्टार्टअप!

सकाळ वृत्तसेवा

सीसीटीव्हीद्वारे चित्रित होत असलेल्या फुटेजचे रिअल टाईम विश्‍लेषण करून त्वरित त्यातील गैरप्रकार संबंधितांना कळविण्याचे काम हे स्टार्टअप करीत आहे.

पुणे - सुरक्षेच्या (Security) कारणास्तव एखाद्या ठिकाणी सीसीटिव्ही (CCTV) बसविल्यानंतर त्याद्वारे येणाऱ्या फुटेजवर (Footage) लक्ष देणे देखील महत्त्वाचे काम असते. कारण बऱ्याचदा दुर्घटना घडून गेल्यानंतर ती नेमकी कशी घडली हे पाहण्यासाठी त्या फुटेजचा वापर केला जातो, मात्र ते फुटेज केवळ घटना घडून गेल्यानंतर पाहण्यापुरते मर्यादित न ठेवता ती घडत असतानाच तिला रोखण्यासाठी आवश्‍यक तो अलर्ट देण्याचे काम पुण्यातील स्टार्टअप करीत आहे.

सीसीटीव्हीद्वारे चित्रित होत असलेल्या फुटेजचे रिअल टाईम विश्‍लेषण करून त्वरित त्यातील गैरप्रकार संबंधितांना कळविण्याचे काम हे स्टार्टअप करीत आहे. सीसीटीव्हीद्वारे घटनांची माहिती तातडीने प्रशासकीय यंत्रणेला देणारे ‘रेव्हन’ हे व्हिडिओ अॅनालिटिक्स’ सॉफ्टवेअर ‘पिव्होटचेन सोल्यूशन टेक्नॉलॉजी प्रा. लि.’ (Pivotchain) या ‘स्टार्टअप’ने विकसित केले आहे. विमानतळ, ट्रान्स्पोर्ट हब, शहरातील सीसीटीव्हीचे विश्लेषण करून या ठिकाणी होणारी चोरी, आग आणि मारामारी यासारख्या घटनांची माहिती संबंधित यंत्रणेला हे स्टार्टअप पुरवते. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक राव आणि सीओओ योगेंद्र सिंग यांनी २०१८ साली कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित या स्टार्टअपची सुरवात केली. सॉफ्टवेअर डेव्हलपर असलेल्या राव आणि सिंह यांना अनेक बड्या कंपन्यांमध्ये कामाचा मोठा अनुभव आहे. याबाबत सिंह यांनी सांगितले की, आमचे स्टार्टअप सॉफ्टवेअरद्वारे शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रीकरणाचे विश्लेषण करून, घटनांची माहिती एसएमएस, ईमेल, व्हॉट्सअप संदेशाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना देते.

कोणत्याही दुर्घटनेची माहिती वेळेत मिळाली तर त्यापासून होणारी हानी रोखता येते. तेच काम आमचे स्टार्टअप करीत आहे. जगाला अधिक सुरक्षित स्थान बनवण्याचे आमचे ध्येय आहे.

- दीपक राव आणि सीओओ योगेंद्र सिंग, पिव्होटचेन

महत्त्वाची जबाबदारी...

समाजात किंवा एखाद्या संस्थेत घडत असलेल्या गैरप्रकाराची माहिती प्रशासनाला मिळावी यासाठी सीसीटीव्ही लावले जातात. त्यामुळे प्रवासी, कंपनी किंवा स्टार्टअप सेवा पुरवीत असलेल्या संस्थेतील गुन्हेगारी स्वरूपाची माहिती मिळते. ‘सीसीटीव्ही’वर लक्ष ठेवून हे स्टार्टअप असे गैरप्रकार थांबविण्यास मदत करते.

दुबई विमानतळावर वापर

देशातील अनेक मोठ्या बँका, विविध राज्यांचे पोलिस दल, मेट्रो विभाग देखरेखीसाठी या सॉफ्टवेअरचा वापर करत आहे. याशिवाय दुबई विमानतळ, स्पेनमधील बंदरावरही या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून देखरेख केली जात आहे. या स्टार्टअपमध्ये तीस जण कार्यरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT