पुणे

विनामास्क प्रवाशांवर रेल्वेची तीव्र कारवाई

CD

पुणे, ता. ६ ः रेल्वे स्टेशनवर प्रवाशांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे कठोर पालन व्हावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने तीव्र कारवाई सुरु करण्यास सुरवात केली आहे. गेल्या पाच दिवसांतच ४६ दोषी प्रवाशांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून आठ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे सरकारकडून सर्व नागरिकांना आवाहन केले आहे. मात्र गर्दीच्या ठिकाणी अद्यापही काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. रेल्वे स्थानकावर नियमांचे उल्लंघन केले जात असल्याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर विनाकारण गर्दी करू नये, नियमांचे पालन करावे. या बाबत जनजागृती सुरु केली जात आहे. तसेच फलाटावर देखील गर्दी होऊ म्हणून रेल्वेने फलाट तिकिटाचे दर या पूर्वीच वाढविले आहेत. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत रेल्वे विनामास्क कारवाई करून ६ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay Support AIADMK : तामिळनाडूत महाराष्ट्रासारखी फूट! आण्णा द्रमुकचे दोन भाग; थलपती विजयला थेट पाठिंबा

Pune Grand Tour: ‘पुणे ग्रँड टूर’चे रस्तेही खराब; १६५ कोटींचे काम खोदाईमुळे वाया, नियमांचे उल्लंघन, काम पूर्ण होऊनही दुरुस्ती नाही!

'नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न केले, पण…' ‘कमळी’ फेम अभिनेत्रीने सांगितला बाळंतपणाचा अनुभव, म्हणाली... 'त्या क्षणी खूप रडले…'

PM मोदींनी केलेल्या अचानक घोषणे बद्दल काय आहे शरद पवारांचे मत? केली मोठी भविष्यवाणी

Raj Thackeray criticism narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले 'भुर्दंड जनतेला का ?'

SCROLL FOR NEXT