पुणे

हेडगेवार व्याख्यानमाला

CD

१२६३९

१२६२१


हेडगेवार स्मृती व्याख्यानमाला

जिजाऊ, शिवरायांनी आत्मनिर्भरतेची संकल्पना रुजवली
सुनील देवधर; हिंदू व्यासपीठातर्फे डॉ. हेडगेवार स्मृती व्याख्यानमालेचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांनी आत्मनिर्भरतेची संकल्पना स्वराज्यात रुजवली, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील देवधर यांनी आज येथे केले. हिंदू व्यासपीठातर्फे आयोजित डॉ. हेडगेवार स्मृती व्याख्यानमालेत ते ‘हिंदुत्व आणि आत्मनिर्भर भारत विषयावर बोलत होते. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.
श्री. देवधर म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत संकल्पना पुढे नेण्याचे काम केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज व राजाराम महाराज दूरदृष्टीचे राजे होते. त्यांच्यासह अनेक हिंदू राजांना भविष्याची जाण होती. त्यांनी केलेली कामे आजही लोकांना अचंबित करतात. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे.’’
ते म्हणाले, ‘‘मुगलांनी देशात सत्ता स्थापन केल्यानंतर अनेक चालीरीती भारतात रुजल्या. मात्र, आता देशात कोणत्या ना कोणत्या कारणावरून अशांतता पसरवली जात आहे. हिजाब प्रकरण त्याचेच एक उदाहरण आहे. अशा परंपरा भारतात नव्हत्या. राष्ट्रपुरुषांची नावे घेऊन जातीय तेढ निर्माण केली जात आहे. हेही देशासाठी घातक आहे.’’
आप्पासाहेब दड्डीकर, सूर्यकिरण वाघ, शैलेश बोर्डिकर, केदार मुनिश्वर, अनिरुद्ध कोल्हापूरे उपस्थित होते. उदय सांगवडेकर यांनी स्वागत केले.

आजचे व्याख्यान
वक्ते ः विनय चाटी
विषय ः काश्मीर फाईल उलगडताना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश मस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : ठाण्यातून नरेश म्हस्के आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

Sharad Pawar : जनतेसाठी माझा आत्मा अस्वस्थ ; शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर

Khambatki Ghat : भररस्त्यात बस बंद पडल्याने पुणे-सातारा महामार्गावरील खांबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT