पुणे

महाराष्ट्र मिलिटरी फाउंडेशनतर्फे प्रशिक्षण

CD

पुणे, ता. ६ ः महाराष्ट्र मिलिटरी फाउंडेशनच्या वतीने ‘आझाद हिंद सेने’च्या प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या शहरांतील १०० ते १५० तरुण-तरुणींनी सहभाग घेतला. या वेळी कर्नल शशिकांत महाजन (निवृत्त) आणि ग्रुप कॅप्टन भालचंद्र लद्दे (निवृत्त) यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. देशामध्ये जातीय तेढ निर्माण न करता एक भारतीय नागरिक म्हणून एकात्मतेच्या भावनेने देशाच्या आंतरिक सुरक्षेसाठी या प्रशिक्षणाचे महत्त्व असेल. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी या प्रशिक्षणात सहभाग घ्यावा, असे या वेळी महाजन यांनी सांगितले. संस्थेच्या वतीने लष्कर, पोलिस दलातील भरतीसाठी तरुणांना प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणामुळे आतापर्यंत सुमारे तीन हजार जण लष्करात व पोलिस दलात दाखल झाल्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष प्रीतेश गुप्ते यांनी सांगितले. या प्रसंगी संस्थेचे प्रदीप साळुंखे, सचिन मुत्था, मिलिंद अंबिके, रुपेश जयस्वाल, विष्णू सोलकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT