पुणे

पतियाळातील माॅडेल काॅलनी नाला पर्यावरणीय दृष्ट्या पुनरुज्जीवित...

CD

लोगो- पंचगंगा वाचवूया
....

मॉडेल कॉलनीचे ‘मॉडेल’ प्रभावी
उत्तर भारतातील ४० नाले पर्यावरणीयदृष्ट्या पुनरुज्जीवित; कोल्‍हापुरातही वापर शक्य
संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : पतियाळा जिल्ह्यातील (पंजाब) येथील धामू माजरा गावातील मॉडेल कॉलनी नाला पर्यावरणीयदृष्ट्या पुनरुज्जीवित करण्याची किमया भारतीय आयुर्वेद व वनौषधींच्या साह्याने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाने साधली आहे. दिल्लीतील वेदिक श्रीजन, पतियाळातील इंपेरियम अर्थ अॅडव्हायजर्स व कोल्हापुरातील अर्थ हिल टेक्नॉलॉजीसचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. भारतीय बनावटीची आयुर्वेदिक व हर्बल औषधे वापरून सुमारे एक किलोमीटरच्या नाल्याचे पंजाब प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने प्रदूषण कमी झाले आहे.
मॉडेल टाऊन नाल्यात जलपर्णी वाढली होती. शिवाय शेवाळाने नाला झाकला होता. दररोज दहा एमएलडी सांडपाणी नाल्यातून वाहत असल्याने डासांचे प्रमाणही वाढले होते. त्याचे सर्वेक्षण तिन्ही संस्थांनी मार्च २०२१ मध्ये केले. सांडपाण्याचा रंग काळसर होऊन तळाला प्रदूषित कणांचा थर साचला होता. परिणामी जलचरांचे अस्तित्व संपुष्टात आले होते. एसटीपी प्लांटद्वारे प्रक्रिया केलेले पाणीही नाल्यात मिसळत होते.
पंजाबमधील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पाहणीत धामू माजरा परिसरात साथीचे रोग वाढल्याचे स्पष्ट झाले होते. ही माहिती प्रदूषण महामंडळाला मिळत होती. त्यानंतर नाल्याचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन करण्यासाठी एकूण नाल्यांपैकी एक किलोमीटरच्या नाल्याचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू झाले. नाल्यावरील चार ठिकाणी आयुर्वेदिक व हर्बल औषधे मिसळण्यास सुरवात केली. तीन महिन्यांनंतर त्यातील बदलांचा अभ्यास करण्यात आला.
........
चार्ट
नाल्यातील औषधांच्या प्रक्रियेनंतरची स्थिती अशी-

टोटल सस्पेंडेड सॉलिड
मार्च २०२१-२३४
जून २०२१- ११०.

आॅईल व ग्रीस
मार्च २०२१- १३.२
जून २०२१-३.९.

बायोकेमिकल आॅक्सिजन डिमांड
मार्च २०२१-७३
जून २०२१-२३.

फॉस्फेट
मार्च २०२१-१९.१
जून २०२१- ११.३.

टर्बिडिटी
मार्च २०२१- १३७
जून २०२१- ३२.४.

टोटल कोलिफार्म
मार्च २०२१-२.२१/१०
जून २०२१- १.७५/१०.

सोडियम
मार्च २०२१-१७४
जून २०२१-६५

हायड्रोजन सल्फाइड
मार्च २०२१-८
जून २०२१-२.२.
...
चौकट
निष्कर्ष काय सांगतात?
-दुर्गंधी, डासांची पैदास पूर्ण थांबली
-पाण्याचा रंग पारदर्शक झाला
-जलपर्णी आपोआप नष्ट झाल्या
...
कोट
या तंत्रज्ञानाच्या साह्याने उत्तर भारतातील सुमारे ४० नाले यशस्वी पर्यावरणीयदृष्ट्या पुनरुज्जीवित केले आहेत. कोल्हापुरातील नदी, तलाव, नाल्यांच्या प्रदूषणासंदर्भात या नैसर्गिक अनोख्या व परिणामकारक सोप्या तंत्रज्ञानाचा वापर करणे शक्य आहे.
-सुनील भाटवडेकर (अर्थ हिल टेक्नॉलॉजी).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: कोकणात जन्म; अनेक पदे भुषवली, पण स्वातंत्र्य लढ्यातील वक्तव्यानं अनभिषिक्त...; ठाकरेंनी उल्लेख केलेले स.का.पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT