पुणे

दोन महिन्यांत वाढले अडीच लाखांहून अधिक मतदार

CD

पुणे, ता. ६ : शहर आणि जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत मतदारांच्या संख्येत तब्बल दोन लाख ६२ हजार ६४५ इतकी वाढ झाली आहे. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या एक लाख ४० हजार ५९३ आणि महिला मतदारांच्या संख्येत एक लाख २१ हजार ९६८ ने वाढली आहे. तर तृतीयपंथी मतदारांमध्ये ८४ इतकी वाढ झाली आहे.
भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने एक नोव्हेंबर २०२१ रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी मतदारांची संख्या ७८ लाख ९५ हजार ८९४ इतकी होती. जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून २१ विधानसभा मतदारसंघात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. ५ नोव्हेंबर २०२२ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार मतदारांची एकूण संख्या ८१ लाख ५८ हजार ५३९ वर पोचली आहे. शहरातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या दोन हजारांहून अधिक आहे.

जिल्ह्यातील विधानसभानिहाय मतदारसंख्या (५ जानेवारी २०२२ रोजी)

मतदारसंघ पुरुष मतदार महिला मतदार

वडगाव शेरी २४६३५४ २२४६१३
शिवाजीनगर १४७७७६ १४३१३६
कोथरूड २२७३९८ २०७१६७
खडकवासला २८८०९१ २५२४५२
पर्वती १८३११४ १७३०२६
हडपसर २९४१९१ २६१६८८
पुणे कॅन्टोन्मेंट १४७९०४ १३९६२०
कसबा पेठ १४२००२ १४४०५१
पिंपरी १९४४३४ १७४३५५
चिंचवड ३००७३२ २६४२३५
भोसरी २७३९०१ २२४१६०
मावळ १८९४०५ १७७४९६
जुन्नर १५८६८४ १५०५२०
आंबेगाव १५२८३६ १४४३१८
खेड-आळंदी १८०२६६ १६५१६६
शिरूर २१७११७ १९६१२९
दौंड १६१४०० १४७२७४
इंदापूर १६३८३२ १४९८६२
बारामती १८२६३२ १७१४६३
पुरंदर २१३८३० १९३१७९
भोर २०६६३५ १८१७६६

जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. महाविद्यालयांमध्ये तरुणांच्या मतदार नोंदणीसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. परिणामी मतदारांच्या संख्येत चांगली वाढ झाली आहे. महिला मतदारांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे.
- मृणालिनी सावंत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे
------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT