पुणे

महामार्गाच्या कडेला कचऱ्याचे ढीग

CD

तळेगाव दाभाडे, ता. १२ : लिंब फाटा ते वडगाव फाट्यापर्यत महामार्गाच्या कडेला कचऱ्याचे ढीग पडले आहे. असेच ढीग तळेगाव स्टेशन ते कातवी रस्त्यावर पडले आहे. शहराच्या वेशीवर पडलेल्या कचऱ्याच्या ढिगाने शहराचे सौंदर्य खराब दिसत आहे. स्वच्छ शहर सुंदर शहर अशी शहराची ओळख आहे. प्लास्टिकमुक्त शहर ही वेगळी ओळख शहराला लाभली आहे. त्याच शहरातील रस्त्यालगत पडलेल्या कचऱ्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न या निमित्ताने चर्चेत आला आहे. सेकंडहोमला पसंती असणाऱ्या शहरात मच्छरांचा प्रादूर्भाव वाढली असून मच्छरांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना मच्छरदाणी, मच्छर कॉइलचा वापर वाढला आहे. महामार्गाच्या कडेला या कचऱ्यात प्लास्टिकच्या पिशव्या, कापडाच्या चिंध्या, कुजलेले अन्न पडले आहे. त्यावर भटकी जनावरे, गाव डुक्करे, कुत्री ताव मारत आहेत. महामार्गाच्या कडेला ठिकठिकाणी तुटलेल्या फरशांचे तुकडे पडले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT