पुणे

शिष्यवृत्तीचा निकाल अखेर जाहीर

CD

पुणे, ता. ७ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ऑगस्ट २०२१ मध्ये घेतलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या परीक्षेचा अंतिम निकाल आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या शुक्रवारी जाहीर केल्या आहेत. या शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवीचे ५७ हजार ३३४, तर आठवीचे २३ हजार ९६२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यातील पाचवीचे १४ हजार २५० आणि आठवीचे १० हजार ७३६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक असणार आहेत.

परीक्षा परिषदेने ही शिष्यवृत्ती परीक्षा १२ ऑगस्ट २०२१ रोजी मुंबई वगळता संपूर्ण राज्यात घेतली. परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल २४ नोव्हेंबर रोजी जाहीर केला, तर गुणपडताळणीसाठी २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाइनद्वारे मागविले होते. परिषदेने दिलेल्या मुदतीत ऑनलाइन आलेल्या परिपूर्ण अर्जावरून संबंधित विद्यार्थ्यांच्या गुणांची पडताळणी केली. गुणपडताळणीसाठी आलेले अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार केला आहे. या निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार केली आहे.

‘‘शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतिम गुणपत्रकाची प्रत परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. छापील गुणपत्रक व प्रमाणपत्र लवकरच शाळांना पोचविण्यात येतील. तसेच, शिष्यवृत्ती रक्कम प्रदान करण्याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडे गुणवत्ता यादीतील संबंधित विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात येत आहे. शिष्यवृत्ती रकमेबाबत यापुढील पत्रव्यवहार त्यांच्या कार्यालयाकडे करण्यात यावा.’’
- एच. आय. आतार, आयुक्त, परीक्षा परिषद

शिष्यवृत्ती परीक्षेची सांख्यिकीय माहिती :
परीक्षेचे नाव : नोंदणी केलेले विद्यार्थी : उपस्थित विद्यार्थी : अनुपस्थित विद्यार्थी : पात्र विद्यार्थी : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी : पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार टक्केवारी
इयत्ता पाचवी : ३,८८,५१५ : ३,३७,३७० : ३७,८७१ : ५७,३३४ : १४,२५० : १६.९९
इयत्ता आठवी : २,४४,३१४ : २,१०,३३८ : २२,८१४ : २३,९६२ : १०,७३६ : ११.३९
एकूण : ६,३२,८२९ : ६,३१,०१४ : ६०,६८५ : ८१,२९६ : २४,९८६ :१४.२०

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ :
- www.mscepune.in
- https://www.mscepuppss.in/
- असा पहा निकाल : संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचा वैयक्तिक बैठक क्रमांक टाका.

राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकाविलेले विद्यार्थी :
इयत्ता पाचवी :
विभाग : विद्यार्थ्याचे नाव
- शहरी विभाग : स्वराज चव्हाण (सी. एस. हायस्कूल वडूज, सातारा)
- ग्रामीण विभाग : तनिष्का गायकवाड (जिल्हा परिषद शाळा, तळेगाव, पुणे)
- सीबीएसई/आयसीएसई शाळांचे विद्यार्थी : निरंजन तोरडमल (पोदार इंटरनॅशनल स्कूल, सातारा)

इयत्ता आठवी :
विभाग : विद्यार्थ्याचे नाव
- शहरी विभाग : श्रावणी धस (वसुंधरा प्राथमिक विद्यालय, आष्टी, बीड)
- ग्रामीण विभाग : उमर शेख (नूतन एमव्ही यूएमव्ही, मिरजगाव, नगर)
- सीबीएसई/आयसीएसई शाळांचे विद्यार्थी : प्राजक्ता चव्हाण (विद्यानिकेतन अकॅडमी, नगर)

पुणे जिल्हा - जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत पहिले तीन क्रमांक
पटकाविलेले विद्यार्थी :
इयत्ता पाचवी :
१. तनिष्का गायकवाड
२. निरमयी गोसावी
३. पुनम घुगे

इयत्ता आठवी :
१. सृष्टी खेडकर
२. सोहम बुद्धीवंत
३. जयेश शिवरकर

संकेतस्थळ मंदावले...
शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता जाहीर झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती निकाल, गुणवत्ता याद्या पाहण्यासाठी संकेतस्थळ ओपन करण्यात येत होते. एकाच वेळी अनेकांकडून हे संकेतस्थळ सर्च होत होते. त्यामुळे संकेतस्थळाची लिंक ओपन करूनही विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी खूप वेळ प्रतीक्षा करावी लागली. ‘‘संकेतस्थळाला कोणतीही अडचण उद्भवलेली नाही. एकाच वेळी लाखो लोक संकेतस्थळ पाहत असावेत, म्हणून निकाल पाहण्यास काहीसा वेळ लागत असावा,’’ असे स्पष्टीकरण राज्य परीक्षा परिषदेतर्फे देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT