पुणे

‘उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी’

CD

पुणे, ता. ११ ः बिटकॉईन फसवणूक प्रकरणातील पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करावी, तज्ज्ञांची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, रवींद्र पाटील याची मालमत्ता जप्त करावी, अशा मागण्या बिटकॉईन प्रकरणी फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांनी सोमवारी केली. तसेच बिटकॉईनच्या या प्रकरणामध्ये तब्बल दीड लाख कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करून त्याची कसून चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
बिटकॉईन गुंतवणुकीत फसवणूक झालेल्या नागरिकांनी सोमवारी पत्रकार परिषदत घेत विविध प्रकारच्या मागण्या केल्या. यावेळी गुंतवणुकदारांच्यावतीने हेमंत दवे व निशा रायसोनी यांनी माहिती दिली. दत्तवाडी व निगडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या बिटकॉईन फसवणूक प्रकरणी दत्तवाडी व निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात मुख्य सुत्रधार अमित भारद्वाज व इतरांना अटक केली. दरम्यान, या प्रकरणाच्या तांत्रिक तपासासाठी सायबर तज्ज्ञ म्हणून नेमलेल्या पंकज घोडे व रवींद्र पाटील यांनीच पोलिसांनी त्यांच्यावर टाकलेल्या विश्‍वासाचा गैरफायदा घेत तक्रारदार व आरोपींच्या वॉलेटमधील बिटकॉईन स्वतःच्या वॉलेटमध्ये वर्ग करीत पोलिसांचीही फसवणूक केली. या प्रकरणात केवळ त्यांचाच सहभाग नसून तत्काली पोलिस अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप गुंतवणुकदारांनी केला.
या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने तज्ञांची उच्चस्तरीय समिती नियुक्त करावी अशी मागणी त्यांनी केली. याबरोबरच बिटकॉईन प्रकरणात अमित भारद्वाज, अजय भारद्वाज आणि विवेक भारद्वाज यांचा सहभाग असून त्यांनी लाखो बिटकॉईनचा अपहार केलेला आहे. भारद्वाज बंधूनी केलेल्या बिटकॉईन चोरीच्या प्रकरणात त्यांच्यावर महाराष्ट्रासह देभरात ४२ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून तब्बल दीड लाख कोटी रुपयांचा हा गैरव्यवहार आहे. पोलिसांनी ब्लॉकचेनमध्ये बिटकॉईनचे व्यवहार अचूकपणे तपासण्यासाठी चैन अनॅलिसीस सॉफ्टवेअरची मदत घ्यावी. रवींद्र पाटील याने त्याच्या ‘केपीएमजी’ कंपनीच्या माध्यमातुन किती बिटकॉईन लंपास केले, याचा सखोल तपास करावा, त्यांच्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा आणि पाटीलची मालमत्ता जप्त करावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

Team India Jersey: टीम इंडियाची T20 जर्सी जेठालालसारखी! सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस, भन्नाट मीम्स व्हायरल

BJP Manifesto : विकसित पुणे घडविणारे ‘संकल्पपत्र’ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रकाशित

SCROLL FOR NEXT