पुणे

मास्क नसल्याच्या नावाखाली उकळले पैसे महापालिकेचे कर्मचारी असल्याचा केला बनाव

CD

पुणे, ता. १४ : खाकी ड्रेस घातलेले काही लोक महापालिका कर्मचारी म्हणून तुमच्या थेट कार्यालयात येतील.... कर्मचाऱ्यांनी मास्क घातला आहे की नाही याची पाहणी करतील...मास्क नसेल, तर पाचशे रुपये दंड या प्रमाणे पैशाची मागणी करतील...असा काहीसा प्रकार कोथरूड येथील एका कंपनीच्या कार्यालयात घडला. कार्यालयात आलेल्या चौघांनी तेथील कर्मचाऱ्यांना महापालिकेचा शिक्का असलेल्या दंडाच्या पावत्या दिल्या आणि पैसे मात्र स्वत:च्या अकाउंटवर घेतले.

खासगी आस्थापना अथवा कार्यालयात थेट शिरून कर्मचारी मास्क वापरत आहे की नाहीत, अशी पाहणी करण्याच्या सूचना अथवा आदेश महापालिकेने त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेले नाहीत. असे असतानाही हे प्रकार शहरात सुरू झाले आहेत. कोथरूड येथील एका कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये घडलेल्या प्रकारावरून हे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे महापालिकेचे कर्मचारी असल्याचे भासविणाऱ्या या चौघांनी त्या कॉम्प्लेक्समधील अन्य कोणत्याही कार्यालयात जाऊन तपासणी केली नाही. केवळ ज्या कार्यालयात महिला आहेत, त्याच कार्यालयात जाऊन ही तपासणी केली असल्याचेही समोर आले आहे.

या वेळी दंडाची रोख रक्कम न देता क्यूआर कोड अथवा ऑनलाइन भरण्याची तयारी दर्शविली. त्यास त्यांनी नकार दिला. या वेळी त्यापैकी एका कर्मचाऱ्याने स्वत:चा गुगल अकाउंट नंबर देऊन त्यावर पैसे पाठविण्यास सांगितले. गुगल अकाउंटवर पैसे जमा झाल्याचे दिसताच ते कर्मचारी निघून गेले.

खासगी आस्थापना अथवा कार्यालयात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांनी मास्क घातले आहेत की नाहीत, अशी तपासणी करण्याबाबतचे कोणतेही आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले नाहीत. कोथरूडमध्ये जो प्रकार घडला, त्याची चौकशी करण्यात येईल. अशा प्रकारे कोणी कार्यालयात येऊन चौकशी करीत असेल, तर त्यांच्याकडे महापालिकेचे ओळखपत्र मागावे.
- राजेंद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त, पुणे महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT