पुणे

आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणात गोपीचंद सानपला पोलिस कोठडी

CD

पुणे, ता. २६ : आरोग्य विभागाच्या ‘गट ड’च्या परीक्षेच्या पेपरसाठी एका एजंटने परीक्षार्थींना पुण्यातील शिरूर येथे एकत्र आणले असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
गोपीचंद रामकृष्ण सानप (वय २८) असे या एजंटचे नाव आहे. सानप व त्याचा साथीदार नितीन सुधाकर जेऊरकर (४६) यांना अटक करून शनिवारी (ता. २६) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सानप हा प्रमुख एजंट आहे तर जेऊरकर हा सानपबरोबर मुलांना पेपर वाटण्याचे काम करत होता. ३१ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे २० परीक्षार्थींना घेऊन आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. प्रत्यक्षात त्याने आणखी काही लोकांना पेपर दिल्याचे समोर आले आहे. त्याला पेपर कोणी दिला, परीक्षार्थींकडून त्यांनी किती पैसे घेतले, यासंबंधीच्या तपासासाठी पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Recruitment 2026: पदवीधरांसाठी खुशखबर! रेल्वेत स्टेशन मास्टरच्या १,२६५ पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे आणि कसा कराल? जाणून घ्या

'तुम्ही निघा इथून!' अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांना भर कार्यक्रमातून हाकललं? Video पाहून नेटकरी म्हणाले...

Beed Jail News : बीड कारागृहाच्या चौकशीत काय निष्पन्न? | Walmik Karad Case

Winter Tourism: ऑल वेदर रोडमुळे उत्तराखंडच्या हिवाळी पर्यटनाला बळ; चारधाम यात्रा संपली, तरी पर्यटकांचा ओघ सुरूच

Samsung Galaxy A08 भारतात लाँच; 6,000 mAh पॉवरफुल बॅटरी आणि 50MP कॅमेरा! किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT