Solar Storm Sakal Digital
पुणे

Solar Storm| ‘सौरवादळ’ म्हणजे काय, परिणाम थेट माणसावर होतो?

सकाळ वृत्तसेवा

Solar Storm Information in Marathi

पुणे, ता. १८ : सूर्याच्या पृष्ठभागावर मोठा स्फोट झाला असून, त्यातून निर्माण झालेले ‘सौरवादळ’ लवकरच पृथ्वीवर धडकणार आहे, अशा स्वरूपाच्या बातम्या आपण नक्की ऐकल्या असतील. पण यातील तथ्ये नेमकी काय आहे? सौरवादळ निर्माण कशी होतात? त्याचा खरंच माणसावर परिणाम होतो का? पंचविसाव्या सौरचक्रामुळे वादळांची संख्या खरंच वाढली का? त्याचाच घेतलेला हा आढावा...

सौरवादळ म्हणजे काय? (What is a solar storm and what does it do?)
आकारमानाचा विचार केला तर आपल्या सूर्यामध्ये १३ लाख पृथ्वी मावतील. पृथ्वीप्रमाणेच सूर्यालाही महाकाय विद्युतचुंबकीय क्षेत्र आहे. सूर्याचं चुंबकीय क्षेत्र जेव्हा जास्त बलवान असतं तेव्हा, विशिष्ट भागात सौर डागांची संख्या वाढते, मोठे झालेल्या डागाच्या ठिकाणी विस्फोट होऊन सौरवादळांची निर्मिती होते.

काय आहे  सौरस्फोट?
सूर्याच्या आंतरिक भागात होणाऱ्या चुंबकीय बदलांमुळे पृष्ठभागावर होणाऱ्या स्फोटांना सौरस्फोट असे म्हणतात. कोरोनल मास इजेक्शन (सीएमई) Coronal Mass Ejections (CMEs) नावाच्या सौरस्फोटांत प्लाझ्माची घनता जास्त असते. या स्फोटांचा आकार आपल्या पृथ्वीपेक्षाही मोठा असू शकतो. यातून बाहेर पडलेले प्रभारीत कण अंतराळात फेकले जातात.

सौर डागांचे ‘एकादश वर्षीय चक्र’
सूर्याच्या पृष्ठभागावर सौरडागांचे प्रमाण वाढणे आणि कमी होण्याच्या चक्राला  सौरचक्र असे म्हणतात. या वेळी सूर्याचा दक्षिण आणि उत्तर ध्रुव एकमेकांची जागा बदलत असतात. साधारणतः ११ वर्षांनी सौर डागांची संख्या जास्तीत जास्त होते. यालाच सौर डागांचे ‘एकादश वर्षीय चक्र’ असे म्हणतात.

पंचविसावे सौरचक्र
शास्त्रज्ञांनी १७५५पासून  सौरचक्रांची गणना आणि अभ्यास करायला सुरवात केली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये २५व्या  सौरचक्राला सुरवात झाली आहे. मागील तिन्ही  सौरचक्रे हे सामान्य सौरचक्रांपेक्षा कमी ताकदीची होती.

परिणाम थेट माणसावर होतो?
सौर वादळाचा मानवी शरीरावर प्रत्यक्ष परिणाम आढळत नसला तरी पृथ्वीवरील संदेशवहन यंत्रणा व वीजपुरवठा पूर्णपणे निकामी करण्याची ताकद सौरवादळांमध्ये असते. जितके सौर डाग जास्त, तितकी सौर वादळे जास्त व परिणामी सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा जास्त असे ढोबळमानाने म्हणता येईल. उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावर कधी-कधी दिसणाऱ्या रंगबेरंगी प्रकाश शलाकांची (अरोरा) वारंवारिता यामुळे वाढते. मोठ्या सौरवादळांच्या ध्रुवाजवळून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या दिशानिर्देशन प्रणालीवरही परिणाम होतो. त्यामुळे त्यांना लांब अंतरावरून जाण्यास सांगण्यात येते.

पृथ्वीचे स्वतःचे कवच (Can a solar storm destroy Earth?)
विद्युत चुंबकीय क्षेत्रामुळे पृथ्वीभोवती स्वतःचे संरक्षण कवच आहे. सौरवादळातून येणारे चार्ज पार्टिकल किंवा प्लाझ्मा थेट वतावरणात शिरकाव करू शकत नाही.

जीवसृष्टी निर्माण होण्याच्या आधीपासून आणि या नंतरही सौरचक्रे अविरत चालू राहणार आहे. त्याचा थेट परिणाम जीवसृष्टीवर होत नाही. मात्र, उपग्रह, पृथ्वीचे ध्रुव आणि विद्युत वहनावर मोठ्या सौरवादळांचा परिणाम होऊ शकतो. त्यादृष्टीनेही आवश्यक उपाययोजना केल्या जातात. सौरवादळांचा जगभरातील शास्रज्ञ अभ्यास करत आहे.
- डॉ. दिव्य ओबेरॉय, सौरभौतिकशास्त्रज्ञ, एनसीआरए, पुणे

हे जाणून घ्या
- सौरचक्राच कालावधी : ११-१२ वर्षे
- आजवरच्या सौरचक्रांचा अभ्यास : २४
- आजपर्यंतच्या सर्वांत मोठ्या सौरडागाचा आकार : १० पृथ्वी बसतील एवढा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAE Golden Visa confusion: 23 लाखांत मिळतोय लाइफटाइम गोल्डन व्हिसा? युएई सरकारने दिलं स्पष्टीकरण

Goa Crime: पुणेकर पर्यटकाची गोव्यात दादागीरी, गेट बंद केल्याच्या वादातून थेट कारखाली चिरडलं! सुरक्षा रक्षक गंभीर जखमी

Mars Rock Auction : मंगळावरून आलेल्या सर्वात मोठ्या उल्कापिंडाचा लिलाव होणार; किंमत तब्बल ३४ कोटी रुपयांपर्यंत, आश्चर्यकारक फोटो पाहा..

Latest Maharashtra News Live Updates: विदर्भात पावसाचा जोर कायम, पुरामुळे बंद झाले 'हे' मार्ग

Guru Purnima 2025 Remedies: गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी 'हे' उपाय करा, मात लक्ष्मी-नारायणाची तुमच्यावर कायम राहील कृपादृष्टी

SCROLL FOR NEXT