पुणे

खरा वैज्ञानिक सत्यशोधक असतो गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर; व्हर्च्युअल साजरा झाला विज्ञान दिन

CD

पुणे, ता. २८ ः ‘‘आपल्या भवतालाबद्दल नेहमी जिज्ञासू असणे, सातत्याने प्रश्नांचा मागोवा घेणे आणि कष्ट करण्याची तयारी ठेवणे हे वैज्ञानिकाचे मूलभूत गुणधर्म आहे. खऱ्या अर्थाने वैज्ञानिक हा सत्यशोधक असतो, त्याचबरोबर सत्यावर ठाम राहतो,’’ असे प्रतिपादन गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांनी केले.

आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राच्यावतीने (आयुका) व्हर्च्युअल आयोजित विज्ञान दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ज्येष्ठ खगोलशास्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, आयुकाचे संचालक डॉ. शोमकराय चौधरी, डॉ. सुहृद आणि डॉ. अनुप्रीता मोरे उपस्थित होते. देशभरातील विद्यार्थ्यांनी या वेळी शास्रज्ञांना प्रश्न विचारले. डॉ. नारळीकर म्हणाल्या, ‘‘नव्या संशोधनासाठी घटनांच्या नोंदी ठेवणे गरजेचे आहे. सातत्याने निरीक्षण करणे आणि योग्य नोंदी ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यातील विद्यार्थ्यांना त्याचा संशोधनासाठी फायदा होईल.’’ भारतीयांना नोंदी ठेवण्याची सवय नसल्याची जाणीवही त्यांनी करून दिली.

आदर्श बदलत गेले
डॉ. जयंत नारळीकरांना तुमचा आदर्श कोण, असे विचारले असता. त्यांनी जीवनाच्या प्रत्येक वळणावर आदर्श बदलत गेल्याचे सांगितले. ते म्हणाले,‘‘शाळेत असताना माझे वडील माझे आदर्श होते. तेव्हा मला गणिताचा प्राध्यापक बनावे वाटले. केंब्रिजमध्ये असताना मला अनेक प्रतिभावान लोक भेटले. फ्रेड हॉईल यांच्या इलेक्ट्रोडायनॅनिमकच्या व्याख्यानांनी मला प्रभावित केले. त्यांनी मला सातत्याने प्रश्न विचारण्याचे आणि पुरवा शोधण्यासाठी शिकविले. लोकांनी जे गृहीत धरले होते. त्यासंबंधीचे प्रश्न मी विचारत होतो.’’ डॉ. चौधरी यांनीही त्यांचे वडील त्यांच्यासाठी आदर्श असल्याचे सांगितले.

व्हर्च्युअल आयोजन
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर), राष्ट्रीय खगोलशास्र आणि खगोलभौतिकी केंद्र (एनसीआरए) आदी राष्ट्रीय संशोधन संस्थांनी व्हर्च्युअल विज्ञान दिनाचे आयोजन केले होते. एनसीआरएच्यावतीने मंगळवारीही (ता.१) विविध ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: मुंबईकरांनी काळजी घ्या! समुद्राला मोठी भरती येणार; पण कधी? तारीख सांगत बीएमसीकडून इशारा जारी

IND vs SA, ODI मालिका सुरू असतानाच भारताच्या क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा; वर्ल्डपही खेळला, तर CSK चेही केलं प्रतिनिधित्व

Viral Video: मुली कधीच मुलांना प्रपोज का करत नाहीत? रामायणाशी संदर्भ जोडलेलं कारण आलं समोर, पाहा व्हायरल व्हिडिओ

Pan Masala New Government Rules : पान मसाला कंपन्यांसाठी सरकारने जारी केले नवे निर्देश; जाणून घ्या, नवा नियम काय असणार?

Pune News : फसवणूक केलेले १४ कोटी महिनाभरात परत करू; आरोपींचे न्यायालयात हमीपत्र सादर; संगणक अभियंत्यासह पत्नीची फसवणूक प्रकरण!

SCROLL FOR NEXT