निर्बंध शिथिल केल्याने पुणेकरांना मोठा दिलासा फोटो क्रेडिट - विजय बाटे
पुणे

निर्बंध शिथिल केल्याने पुणेकरांना मोठा दिलासा!

नाट्यगृह, चित्रपटगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, शैक्षणिक संस्था पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा संसर्ग आणि रुग्णसंख्या कमी झाल्याने राज्य सरकारने राज्यातील निर्बंध शिथिल केले आहेत. हे आदेश मिळाल्यानंतर आज (ता. ३) पुणे महापालिकेने याबाबत आदेश काढले. नाट्यगृह, चित्रपटगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, शैक्षणिक संस्था पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आदेश काढले आहेत.

असे आहेत आदेश...
- सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम, विवाह सोहळे, अंत्यविधी हे जागेच्या किंवा हॉलच्या ५० टक्के क्षमतेने सुरू होतील
- महापालिकेच्या क्षेत्रातील विशेष शाळा, कार्यशाळा, कोचिंग क्लास, वसतिगृहे, अंगणवाडी पूर्ण क्षमतेने सुरू करता येतील
- मॉल, चित्रपटगृह, नाट्यगृह, रेस्टॉरंट, बार, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जिम, स्पा, धार्मिकस्थळे, पर्यटनस्थळे १०० टक्के क्षमतेने सुरू करता येतील
- लसीकरण झालेल्या नागरिकांना प्रवासासाठी बंधन नाही
- लसीकरण अपूर्ण असलेल्या नागरिकांना आंतरराज्य प्रवासासाठी ७२ तास आधी आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्‍यक
- सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये, औद्योगीक व वैज्ञानिक संस्था १०० टक्के क्षमतेने सुरू होतील
- सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होणार
- हे आदेश पुणे कॅन्टोन्मेंट व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांनांही लागू राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तृणमूलच्या महिला नेत्याच्या घरी छापा, ३०० तोळे सोन्याचं घबाड; अधिकारी चक्रावले

Who Will Lead DC? रिषभ पंत, लोकेश राहुल, अक्षर पटेल... IPL 2027 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व कोण करणार? 'दादा' सर्व निर्णय घेणार

विधानसभेत मराठीची अब्रू गेली, राज ठाकरेंचा नार्वेकरांवर हल्लाबोल, सत्ताधाऱ्यांची पोलखोल! म्हणाले, मराठी माणसाने विचार करावा ... VIDEO

Sindhudurg Rain Update : 'एल निनो'च्या चिंतेला तूर्त ब्रेक!...अखेर सिंधुदुर्गात मॉन्सून सक्रिय; 30 जूनपर्यंत धो-धो बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

IPL 2027 Trade: आयपीएल इतिहासातील High-Profile डिल! रिषभ पंत १२ कोटींचा तोटा सहन करून 'या' संघाच्या ताफ्यात, कुलदीप यादव LSG कडे

SCROLL FOR NEXT