पुणे

व्यावसायिकास निर्जनस्थळी नेऊन लुटले

CD

पुणे, ता. ७ : फर्निचरचे काम करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकास बोलावून त्यास निर्जनस्थळी नेत चोरट्यांनी त्याच्याकडून जबरदस्तीने रोख रक्कम, मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. त्याचबरोबर फोन पे द्वारे त्यांच्या खात्यातील काही रक्कमही जबरदस्तीने पाठविण्यास भाग पाडले. ही घटना विमानळ परिसरातील फॉरेस्ट पार्क परिसरात बुधवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी व्यावसायिकाच्या खिशातील ५ हजार रुपये, मोबाईल, सोन्याची बाळी काढून घेतली. त्याचबरोबर फोन पेचा वापर करून खात्यातून ४२ हजार ८०० रुपये आरोपींनी स्वतःच्या बॅंक खात्यात जमा केले. असे एकूण ६१ हजार ८०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटला.
याप्रकरणी अमराराम चौधरी (वय ३२, रा. वडगाव शेरी) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने बुधवारी संपर्क साधला. त्याने "आपल्याला फर्निचरचे काम करायचे आहे'' असे सांगून, रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास फॉरेस्ट पार्क रस्त्यावरील म्हशीच्या गोठ्याजवळ बोलावून घेतले. त्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन दोघांनी फिर्यादीस पकडून निर्जनस्थळी नेले व लुटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Rain Forecast : विदर्भात पावसाचा जोर वाढणार ; चक्रीवादळाचा प्रभाव, २४ सप्टेंबरनंतर मुसळधारेची शक्यता

FDA Action: 'सुलेमान मिठाईवाला'वर बडगा! मुंबईतील १० आस्थापनांचे परवाने एफडीएकडून निलंबित

Asian Games 2026 : भारतीय नौकानयनपटू 'संपावर' जाण्याच्या तयारीत! जपानमध्ये खेळाडूंकडून बंडाची भूमिका; नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : गंगाखेड तालुक्यात गांजाची लागवड, ७६.९६ लाखांचा माल जप्त

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून 3983 क्युसेक विसर्ग; कृष्णा नदीची पातळी वाढणार, आज सायंकाळपर्यंत पाणी पोहोचणार सांगलीत

SCROLL FOR NEXT