पुणे, ता. २८ ः ‘‘गिर्यारोहण विषयातील अभ्यासक्रमामुळे तरुणांना नवी संधी मिळेल. पदवीपासून ते पीएचडीपर्यंतचा गिर्यारोहण विषयाचा अभ्यासक्रम भारतात रुजावा,’’ असे मत नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनिअरिंगचे (एनआयएम) प्राचार्य कर्नल अमित बिश्त यांनी व्यक्त केले.
गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनिअरिंग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि एनआयएमच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘डिप्लोमा इन माउंटनिअरिंग अँड अलाईड स्पोर्ट्स’च्या पहिल्या तुकडीचे हिमालयातील प्रशिक्षण अभ्यासक्रम नुकतेच पूर्ण झाले. या अभ्यासक्रमाच्या ‘बॅज प्रदान’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी इंडियन माउंडनिअरिंग फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रा. हर्षवंती बिश्त यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बॅज प्रदान करण्यात आले. यावेळी गिरीप्रेमी संस्थेच्या संस्थापिका उषःप्रभा पागे, ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे आदी उपस्थित होते. ‘डिप्लोमा इन माउंटनिअरिंग अँड अलाईड स्पोर्ट्स’ हा गिर्यारोहण अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्रात सह्याद्री पर्वतरांगेत प्रशिक्षण घेतल्यानंतर दुसऱ्या सत्रात अतिउंचीवरील गिर्यारोहण प्रशिक्षणासाठी ४० विद्यार्थी उत्तरकाशी येथील एनआयएम येथे दाखल झाले होते. एनआयएम येथे २४ दिवसांच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी हिमाच्छादित कड्यांवर चढणे, नदी ओलांडणे, बचाव व सुरक्षा आणि उंच शिखरावरील गिर्यारोहण अशा विविध गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात आले. एनआयएमचे प्रशिक्षक असलेले दशरथ रावत, विनोद गुसैन, नायब सुभेदार गिरीश नेगी आदींनी या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. तर प्रशिक्षणादरम्यान डॉ. प्रमोद पाटील यांची ‘सर्वोत्तम प्रशिक्षणार्थी’ म्हणून निवड करण्यात आली.
प्रा. हर्षवंती बिश्त म्हणाल्या, ‘‘भारतीय गिर्यारोहण इतिहासातील मैलाचा दगड म्हणून या अभ्यासक्रमाकडे पाहता येईल. गिर्यारोहणासारख्या साहसी व तांत्रिक खेळाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारा आणि गिर्यारोहकांची नवी पिढी घडविणारा हा अभ्यासक्रम महत्त्वाची भूमिका बजावत आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.