पुणे

उसतोडीपेक्षा सोपी वाटली ‘एमपीएससी’ची परीक्षा मित्राच्या सल्ल्याने यशाला गवसणी घालत भुजंगची कर निरीक्षकपदी झेप

CD

पुणे, ता. ३१ : घरी अठरा विश्वे दारिद्र्य...कष्टाशिवाय दुसरा पर्याय नाही...पाहुण्यांकडे राहात शिक्षण पूर्ण केले...पदवीचे शिक्षण मुक्त विद्यापीठातून पूर्ण करत ऊसतोडीचे काम...कष्टाचे काम बघून मित्राने दाखवलेल्या रस्त्यावर जाण्याचा निर्णय...सहा ते सात वर्षांत पाच वेळा परीक्षेत अपयशी होऊनही राज्य कर निरीक्षक पदाला गवसणी घातली. ही गोष्ट आहे, एका ऊसतोड कामगाराच्या मुलाची.

पांगरा (ता. आष्टी, जि. बीड) येथील भुजंग पांडुरंग मिसाळ याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या संयुक्त गट ब या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक या पदासाठी निवड झाली आहे. शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने ऊसतोडीचे काम सुरुच होते. हे काम नसेल त्यावेळी गावातील मुलांसोबत विहीर खोदण्याच्या कामासाठी जात. कष्‍टाचे कम बघून यापेक्षा अर्धे कष्ट जरी केलेस तरी, सरकारी नोकरी मिळेल, असे सांगत शिवा काळे या मित्राने एमपीएससी करण्याचा सल्ला दिला. आणि तिथून पुढे सुरू झाला रोज जिंकण्यासाठीचा संघर्ष.

सहा वर्षांपर्यंतच आई-वडिलांचा सहवास मिळाला. त्यानंतर शिक्षणासाठी आजीकडे राहावे लागले. आजी, मामा आणि मावशी यांच्याकडे राहात १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले. यशवंतराव मुक्त विद्यापीठातून बी.ए.ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर डी.एड पूर्ण केले. शिक्षक भरती बंद झाल्यामुळे नोकरी मिळणे कठीण होऊन बसले होते. मात्र, मित्राचा सल्ला कामी आला. रोज फक्त जिंकण्याच्या उद्देशाने लढत राहिलो. त्या कष्टाने फळ मिळाल्याचे भुजंग याने सांगितले.

भर उन्हाच्या प्रहरात ऊस तोडण्याच्या परीक्षेपेक्षा एमपीएससीची परीक्षा सोपी वाटली. कोणत्याही गोष्टीत सातत्य राखणे महत्त्वाचे आहे. मोठ्या भावाला एसटीमध्ये नोकरी मिळाली, म्हणूनच या स्पर्धेत टिकून राहाता आले. गावातील मुलांना, परिवाराला आणि आई-वडिलांना सोबत घेऊन पुढचा संघर्ष सुरू ठेवणार आहे.
- भुजंग मिसाळ, राज्य कर निरीक्षक

PNE22S53420

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT