पुणे

पाली-बौद्ध अध्ययन जागरूकता अभियान

CD

पुणे, ता. २५ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागाच्या प्राध्यापक, विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती साजरी केली. विभागात चालविल्या जाणाऱ्या पाली व बौद्ध अध्ययन क्षेत्रातील पदविका व पदव्युत्तर अशा १६ अभ्यासक्रमांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचावी या उद्देशाने विभागातर्फे ‘पाली व बौद्ध अध्ययन जागरूकता अभियान’ राबविण्यात आले.
अभियानांतर्गत पिंपरी येथील पालिका भवनासमोरील डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, दापोडी येथील त्रैलोक्य बौद्ध महाविहार, तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. आंबेडकरांचा पुतळा या तीन ठिकाणी माहिती कक्ष उभारण्यात आले. माहिती कक्षांच्या माध्यमातून विभागातील अभ्यासक्रमांची माहिती देणारी पत्रके वाटण्यात आली आणि अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या संभाव्य लोकांची आगाऊ नावनोंदणी करण्यात आली. पाली व बौद्ध अध्ययन या विषयांची ओळख होण्याच्या दृष्टीने विभागातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांचे प्रदर्शनदेखील पिंपरी येथील माहिती केंद्रात मांडण्यात आले होते. अभियानात डॉ. प्रवीण तलअत, तृप्ती तायडे, दीपाली पाटील, रितेश ओव्हाळ, प्रणाली वायंगणकर, डॉ. मृगेंद्र प्रताप व दीपक गायकवाड यांनी दिली. या अभियानात सुमारे २५०० माहिती पत्रके वितरित करण्यात आली व सुमारे ८०० इच्छुकांनी आगाऊ नावनोंदणी केली. या अभियानाची दुसरी फेरी बुद्धपैर्णिमच्या दिवशी म्हणजेच १६ मे २०२२ रोजी राबविली जाणार असल्याचे प्रा. देवकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

Marathi News Live Updates: मुलाखती पुढे ढकलणे पात्र उमेदवारांवर अन्याय, मुख्यमंत्र्यांना निवेदन

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

‘1 किलो सोयाबीन काढून दाखवा, क्विंटलभर काजू-बदाम घेऊन जा’; सोयाबीनच्या नुकसानीवर शेतकऱ्याचा संताप |

SCROLL FOR NEXT