पुणे

माल वाहतूक खर्चात २५ टक्के वाढ येत्या १५ एप्रिलपासून अंमलबजावणी ः डिझेल, पेट्रोल दरवाढीचा परिणाम

CD

पुणे, ता. ८ ः पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा फटका आता माल वाहतूक व्यवसायालाही बसू लागला आहे. या इंधन दरवाढीमुळे सध्याच्या दरात माल वाहतूक करणे अशक्य होऊ लागले आहे. त्यामुळे आता माल वाहतुकीच्या खर्चात (वाहतूक भाड्यात) सध्याच्या तुलनेत सुमारे २५ टक्के वाढ करण्याचा निर्णय माल वाहतूकदारांनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या १५ एप्रिलपासून केली जाणार आहे. यामुळे माल वाहतुकीसाठी भाड्याने वाहन घेणाऱ्यांना आता मालाच्या वाहतुकीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

माल वाहतूक दरवाढीचा निर्णय दि. पूना डिस्ट्रिक्ट मोटार गुडस ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने घेतला आहे. ही दरवाढ करण्यासाठी या असोसिएशनच्या व्यवस्थापक मंडळाची तातडीची सभा ५ एप्रिलला घेतली. या सभेत या दरवाढीबाबतचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष राम कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या किमतीत भरमसाट वाढ केली आहे. यामुळे माल वाहतूक करणाऱ्या ट्रक, टेम्पो यासारख्या वाहनांना रोज मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. त्यातच टायर, आॅइल, वाहनांचे सुटे भाग (स्पेअर पार्टस), मजुरी (लेबर चार्जेस) मोठी वाढ झालेली आहे. तसेच टोल, वाहनांचा त्रयस्थ पक्ष विमा रिस्क (थर्ड पार्टी विमा रिस्क) आदींच्या दरातही दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे माल वाहतुकीची दरवाढ करण्याशिवाय वाहतूकदारांसमोर अन्य पर्याय शिल्लक राहिला नव्हता. त्यामुळे ही दरवाढ केली असल्याचे कदम आणि संघटनेचे मानद सचिव राजेंद्र खेडेकर यांनी संयुक्तपणे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT