पुणे

आता बँकेत पासवर्ड नाही, तुमचाच चेहरा ओळखला जाणार

CD

बँकेत आता तुमचा
चेहराही बनेल ‘पासवर्ड’!

कृत्रिम बुद्धिमत्ता, बोटांचे ठसे आणि चेहरा ओळख प्रणालीचा होणार वापर

हरेंद्र केंदाळे : सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. ९ : बँकिंग क्षेत्रात पुढील काही वर्षांत मोठे तांत्रिक बदल दिसणार आहेत. ग्राहकाचा चेहरा, बोटांचे ठसे, मोबाइल वापरण्याची पद्धत आणि व्यवहारांची सवय यावर आधारित नवी सुरक्षा व्यवस्था विकसित होत असून, जून २०२६ पासून काही बँका आणि व्यवहार प्रणालींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पडताळणीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे.
गेल्या काही वर्षांत आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. बनावट संकेतस्थळे, मोबाइल नियंत्रण ॲप, ग्राहकांना येणारे फसवणुकीचे कॉल आणि माहिती चोरी या प्रकारांमधून अनेक ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत आहे. त्यामुळे आता बँकिंग क्षेत्र केवळ ‘ओटीपी’ किंवा ‘पासवर्ड’सारख्या सुरक्षेवर अवलंबून न राहता ग्राहकाची प्रत्यक्ष ओळख पडताळण्यावर भर देत आहे. नवीन प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ग्राहकाच्या व्यवहारांचे विश्लेषण करणार आहे.
---
ग्राहकाची सवय ओळखीचा भाग

ग्राहक नेहमी कोणत्या वेळेत व्यवहार करतो, व्यवहाराची सरासरी रक्कम किती असते, कोणत्या शहरातून व्यवहार होतात, मोबाइल वापरण्याची पद्धत कशी आहे, याचा अभ्यास केला जाणार आहे. यामुळे अचानक वेगळ्या पद्धतीचा व्यवहार झाल्यास प्रणाली लगेच सावध होणार आहे.

-----
‘बायोमेट्रिक’ने सुरक्षावाढ

२०२६ च्या शेवटी आणि २०२७ दरम्यान बायोमेट्रिक आधारित व्यवहारांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात चेहरा ओळख प्रणाली, बोटांचे ठसे, डोळ्यांची ओळख, आवाज ओळख तंत्रज्ञान यांचा वापर आर्थिक व्यवहारांमध्ये वाढू शकतो. मोठ्या रकमेच्या व्यवहारांमध्ये अतिरिक्त बायोमेट्रिक पडताळणी आवश्यक केली जाऊ शकते.
------

मोबाइलच होईल बँक शाखा
आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अभ्यासकांच्या मते, पुढील काही वर्षांत मोबाइल हेच ओळखपत्र, व्यवहार केंद्र, स्वाक्षरी, बँक खाते म्हणून वापरले जाईल. यामुळे बँकिंग क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बायोमेट्रिक सुरक्षेवर आधारित नवे युग सुरू होत असल्याचे चित्र दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: राजस्थान रॉयल्सने स्वतःसाठी खड्डा खणला... गुजरात टायटन्समुळे Point Table फिरला; PBKS, RCB ला धक्का

Donald Trump: व्हाईट हाउसमध्ये वैदिक मंत्रोच्चारण; बीएपीएस स्वयंसेवकांनी वैश्विक शांततेसाठी केली प्रार्थना

RR vs GT Live : छोटी हाईट, वातावरण टाईट! वैभव सूर्यवंशीने मोडला विराट, सूर्या, श्रेयस अन् ख्रिस गेलचा विक्रम; बनतोय नवा 'हिटमॅन'

RR vs GT Live : आशिष नेहराने खुणावलं... मोहम्मद सिराजने अगदी तसं केलं... वर्ल्ड रेकॉर्ड करणारा वैभव सूर्यवंशी असा फसला Video

SSC Exam Result : निरक्षर आई-वडिलांच्या मुलाने दहावीत मिळविले ९४ टक्के गुण

SCROLL FOR NEXT