पुणे

केळगावातील मारहाणप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल

CD

आळंदी, ता. १९ : रस्त्यावर गाडी उभी करण्याच्या वादातून लग्नासाठी आलेल्या वऱ्हाड्यांनी केळगाव (ता. खेड) येथील दोन भावांसह चौघांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सोमनाथ हनुमंत मुंगसे (वय ४८, रा. केळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. अक्षय श्रीरंग भोसले (वय २०, रा. कात्रज पुणे), विकास शांताराम पवार(वय २५, रा. अंतरवाली ता. राजगड), उमेश भीमराव जाधव (वय २५, रा. आंबे पठार ता. हवेली), सूरज नरेश पवार (वय २१, रा. आंबे पठार, ता. हवेली), सिद्धेश्वर लक्ष्मण चोरगे (वय २०, रा. वांगणेवाडी, ता. राजगड), जीवन शिवाजी पवार (वय २४, अंत्रोली राजगड ), नरेश कोंडीबा पवार (वय ५५, रा. अंत्रोली राजगड), शांताराम कोंडीबा पवार (वय ५७, रा. अंत्रोली राजगड ), प्रकाश शांताराम पवार (वय २९, रा. अंत्रोली राजगड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केळगाव येथील ‘गुरुकृपा प्रोविजन स्टोअर्स’समोर रविवारी (ता. १७) दुपारी तीनच्या सुमारास आरोपींनी दोन चारचाकी वाहने उभी केली होती. येथे पार्किंग करू नका, असे मुंगसे यांनी सांगितले असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. हे भांडण सोडवण्यासाठी आलेले अजय मुंगसे यांच्या डोक्यात पाईप मारला, तर सागर धर्माधिकारी आणि गणेश महुरे यांच्यावर दगडाने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अजय मुंगसे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून अन्य दोघे पायाला मार लागल्याने जखमी झाले आहेत. आळंदी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kondhwa Pune Clash : पुण्यातील कोंढव्यात लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद, धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न; पोलिस स्टेशनवर दगडफेक

'आमच्यात कधीच भांडण नव्हतं' अमृता आणि सोनाली यांनी वैरत्वाच्या चर्चांना दिला पुर्णविराम, म्हणाल्या...

मोहम्मद शमीला पुन्हा ठेंगा? जसप्रीतच्या अनुपस्थितीत टीम इंडियात दिसणार नवे गोलंदाज... कसा असेल संघ, बघा

Liquor New Rule: दारूच्या बाजारात मोठी उलथापालथ; आता 'या' राज्यात बिअर आणि स्कॉच खरेदी करताना बिल पाहूनच धक्का बसेल!

ईशान किशनने आधी CSK फॅन्सना डिवचलं, पण सामन्यानंतर सांगितलं SRH ला जिंकण्यामागचं भावनिक कारण; म्हणाला, 'बहिणीचं निधन...'

SCROLL FOR NEXT