पुणे

आसू : नगरपरिषद आवारात महाराणी सईबाई महाराज साहेब यांच्या पुतळ्यासह शहरात आणखी तीन महापुरुषांचे पुतळे उभारणार : नगरपरिषद बैठकीत निर्णय

CD

फलटणला उभारणार महाराणी सईबाईंचा पुतळा

नगरपालिकेच्या बैठकीत निर्णय; शहरातही आणखी तीन महापुरुषांचे पुतळे

आसू, ता. ११ : शहराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभवात भर टाकणारा निर्णय नगरपालिकेच्या विशेष बैठकीत घेण्यात आला आहे. नगरपालिकेच्या आवारात महाराणी सईबाई यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक- निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिका सभागृहात झालेल्या बैठकीस माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, आमदार सचिन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक शिवरुपराजे खर्डेकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत नगरपालिका कार्यालयाच्या प्रांगणात महाराणी सईबाई यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यासह शहराच्या विविध भागांत आणखी तीन महापुरुषांचे पुतळे उभारण्यास मंजुरी देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा शहरात नवा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे. विशेष म्हणजे, जुना पुतळा नवीन अश्वारूढ पुतळ्याच्या पुढे सन्मानाने पुन्हा बसविण्यात येणार असल्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा पाचबत्ती चौकात उभारला जाणार आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पृथ्वी चौकात, डॉ. आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार आहे. प्रस्तावित सर्व पुतळ्यांच्या उभारणीचे सविस्तर सादरीकरण आर्किटेक्ट रोहन बळीप यांनी बैठकीत केले.

----------------------------
02843
फलटण : बैठकीत मार्गदर्शन करताना समशेरसिंह नाईक-निंबाळकर, समवेत रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सचिन पाटील, शिवरूपराजे खर्डेकर आदी.
-------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

PBKS vs DC Live: स्टार्क, एनगिडी अपयशी ठरले, तिथे २२ वर्षीय माधवने मैदान गाजवले! प्रियांश, श्रेयसच्या फिफ्टीनंतरही माफक धावा...

Pune Jewellery Market: पंतप्रधानांच्या आवाहनाचा पुण्याच्या सराफा बाजारावर काय परिणाम झाला? व्यापारी काय म्हणताएत?

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! पुनर्विकासात आता फक्त घरे नाहीत; पायाभूत सुविधांनाही प्राधान्य मिळणार

SCROLL FOR NEXT