पुणे

बार्शीत हिट अँड रनची घटना; परराज्यातील युवकाचा मृत्यू

CD

बार्शीत हिट अँड रनची घटना; परराज्यातील युवकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. १० : बार्शी शहरातील गाडेगाव रोड परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत उत्तर प्रदेशातील २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहन चालकाने जखमी युवकाला कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले.
नरीज रामकसिन गौतम (वय २२, मूळ रा. जौरासा, ता. हैदरगड, जि. बाराबंकी, उत्तर प्रदेश) हे आपल्या चुलत भावासह बार्शी येथे वास्तव्यास असून मूर्ती कारागीर म्हणून काम करतात. नऊ महिन्यांपासून ते उत्तरेश्वर कांबळे यांच्याकडे मूर्ती बनविण्याचे काम करत होते.
गुरुवारी (ता. ८) रात्री ९.३० च्या सुमारास नरीज यांचा चुलत भाऊ सूरज रामकिशोर गौतम (वय २१) हा मालकांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (एमएच २५ सी २७५६) घेऊन किराणा सामान आणण्यासाठी गाडेगाव रोड परिसरात गेला होता.
बराच वेळ होऊनही सूरज परत न आल्याने मालक उत्तरेश्वर कांबळे यांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने फोन उचलून प्यासा हॉटेलजवळ अपघात झाल्याची माहिती दिली. यानंतर नरीज गौतम व उत्तरेश्वर कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या सूरजला खासगी रुग्णवाहिकेतून बार्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात केले. मात्र डॉक्टरांनी तपासून रात्री १०:३५ वाजता त्याला मृत घोषित केले.
नातेवाइकांनी परिसरातील लोकांकडे चौकशी केली असता, सूरजच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याचे समोर आले. अपघातानंतर वाहन चालकाने जखमीला कोणतीही वैद्यकीय मदत न करता तसेच पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT