महालोकअदालतमध्ये
२,४५७ प्रकरणे निकाली
..
बार्शीत २ कोटी २७ लाख ३२ हजारांची वसुली
....
सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. १० : बार्शी तालुका विधी सेवा समिती व बार्शी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. ९) बार्शी न्यायालयात राष्ट्रीय महालोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. बार्शीचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या राष्ट्रीय महालोकअदालतीत एकूण २ हजार ४५७ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.
यात ७८ प्रलंबित दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तसेच २ हजार ३७९ दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश होता. या महालोकअदालतीत प्रलंबित प्रकरणांतून १ कोटी ५१ लाख ६६ हजार १९१ रुपये तर दाखलपूर्व प्रकरणांतून ७५ लाख ६६ हजार ७४ रुपये अशी एकूण २ कोटी २७ लाख ३२ हजार २६५ रुपयांची वसुली करण्यात आली.
राष्ट्रीय महालोकअदालतीसाठी बार्शी न्यायालयातील ३ हजार ७२१ प्रलंबित व ६ हजार ५०४ दाखलपूर्व अशी एकूण १० हजार २२५ प्रकरणे तडजोडीसाठी विविध लोकअदालत पॅनेलकडे ठेवण्यात आली होती. यासाठी न्यायालयात एकूण चार पॅनेलची स्थापना करण्यात आली होती.
या पॅनेलमध्ये जिल्हा न्यायाधीश विक्रमादित्य मांडे, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर श्रीमती पी. व्ही. राऊत, तृतीय सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर श्रीमती एच. यू. पाटील आणि चतुर्थ सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर श्रीमती आर. पी. बागडे यांचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.