पुणे

आदित्य स्कूलमध्ये नशा मुक्ती अभियान

CD

बालेवाडी, ता. १ : बाणेरमधील श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पोलिस आयुक्तालय पुणे शहर यांच्या माध्यमातून जागतिक अमली पदार्थ विरोधी दिवसानिमित्त नशा मुक्ती अभियान राबविण्यात आले. बाणेर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मुलांनी कुठल्याही प्रकारच्या व्यसनाला बळी पडू नये यासाठी पोलिस आयुक्तालय आणि श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष शिवलाल धनकुडे यांच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक दीपाली जाधव यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रलोभनापासून कसे सुरक्षित राहावे, तसेच सायबर गुन्ह्यांमध्ये लोक कसे अडकले जातात हे उदाहरणासह समजावून सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबासाहेब झरेकर यांनी नशामुक्तीसंदर्भात माहिती दिली. शालेय जीवनात विविध प्रकारच्या व्यसनाला मुले कशी आहारी जातात, याबाबत त्यांनी माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश थिटे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाच्या विविध प्रकारांबद्दल माहिती देत त्यापासून दूर कसे राहावे, याबाबत मार्गदर्शन केले.
संस्थेचे सचिव विराज धनकुडे यांनी सर्व अधिकाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन त्यांचे स्वागत केले. या वेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मुख्याध्यापिका रेखा काळे यांनी सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

PM Narendra Modi: ''घाना देशातल्या ९०० प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांची गुंतवणूक'', द्वीपक्षीय संबंधांवरही मोदी स्पष्ट बोलले

SCROLL FOR NEXT