कामगारांच्या हक्कांवर गदा
आणणरे कायदे ः खर्गे
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.११ ः ‘‘निवडणुका संपण्याची प्रतीक्षा करीत मोदी सरकारने नेहमीच्या भित्र्या पद्धतीने कोणत्याही चर्चेविना कामगारांच्या हक्कांवर गदा आणणारे आणि उद्योगपतींच्या फायद्याचे चार नवे कामगार कायदे लागू केले,’’ असा रोष काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज व्यक्त केला.
स्वातंत्र्योत्तर काळात कामगार हक्कांना बसलेला हा सर्वात मोठा धक्का असून कामगारांच्या हितासाठी लढा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. खर्गे म्हणाले, की
किमान वेतनासाठी अन्नाचे व राहणीमानाचे निकष हटवून ते सरकारच्या अधीन करण्यात आले आहेत. मूळ पगार ५० टक्के अनिवार्य केल्यामुळे कामगारांच्या हातात येणाऱ्या प्रत्यक्ष पगारात घट होईल. तीनशे कर्मचारी असलेल्या कंपन्यांना आता सरकारची परवानगी न घेता कामगारांना कामावरून काढता येईल. या शिवाय रात्रीच्या पाळीसाठी महिलांच्या सुरक्षिततेचे ठोस नियम नाहीत. संपावर जाण्यापूर्वी ६० दिवसांची नोटीस अनिवार्य करून कामगारांचा निषेध करण्याचा अधिकार संपुष्टात आणला आहे.
काँग्रेसचा पाच कलमी पर्यायी कार्यक्रम
-‘मनरेगा’चा विस्तार करून शहरांमध्येही लागू करणे
- चारशे रुपये किमान वेतन
-‘आरोग्याचा अधिकार’ कायद्यांतर्गत २५ लाखांपर्यंत मोफत उपचार
- सर्व असंघटित कामगारांना व्यापक विमा सुरक्षा
- सरकारी कामांमधील कंत्राटी पद्धत बंद करणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.