DHK26A05541
गोरेगाव (ता. पारनेर) : सभासदांना साखर वाटप करताना संभाजी नरसाळे, उमेश नरसाळे, त्रिभुवन लष्करे, अनिल नरसाळे.
.............
गोरेगाव सेवा संस्थेकडून सभासदांची दिवाळी गोड
१ हजार ६५० सभासदांना ३ हजार ३०० किलो साखरेचे वाटप
टाकळी ढोकेश्वर, ता. १५ : दुष्काळी परिस्थितीची झळ सोसणाऱ्या सभासदांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने गोरेगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेतर्फे १ हजार ६५० सभासदांना साखरेचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या या उपक्रमातून प्रत्येक सभासदाला दोन किलोप्रमाणे एकूण ३ हजार ३०० किलो साखर वितरित करण्यात आली.
यावेळी युवा नेते अभयसिंह नांगरे, बाजीराव पानमंद, चंद्रभान शेलार, जालिंदर नरसाळे, तबाजी नरसाळे, संभाजी नरसाळे, उमेश नरसाळे उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष त्रिभुवन लष्करे, उपाध्यक्ष अनिल नरसाळे, सचिव निसार तांबोळी, प्रवीण नरसाळे, अतुल नांगरे, अविनाश नांगरे, निलेश नरसाळे, सागर नरसाळे, संतोष आढाव, गणेश नरसाळे, अंबादास काकडे, पोपट नांगरे, संतोष काकडे यांच्यासह सभासद उपस्थित होते.
लष्करे म्हणाले, की सणासुदीच्या काळात सभासदांना दिलासा मिळावा आणि संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली जावी, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. दुष्काळी परिस्थितीत संस्थेने केलेल्या साखर वाटपामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
........
दुष्काळी परिस्थितीत शेतकरी बांधवांना सणाचा आनंद घेता यावा, या भावनेतून संस्थेच्या माध्यमातून साखर वाटप केले. सभासदांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, हीच आमची सामाजिक बांधिलकी आहे.
- अभयसिंह नांगरे, युवा नेते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.