दौंड, ता. ८ : सोनवडी (ता. दौंड) येथे चुलत आजोबांनी निष्काळजीपणे ट्रॅक्टर मागे घेतल्याने झालेल्या अपघातात दोन वर्षीय चिमुरड्याचा ट्रॉलीखाली चिरडून मृत्यू झाला. याप्रकरणी दौंड पोलिसांनी शुक्रवारी (ता. ८) गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे.
सोनवडी येथे गुरुवारी (ता. ७) दुपारी चारच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. अब्दुल गुड्डूभाई सय्यद (वय ५०, रा. सोनवडी) हे त्यांच्या घरासमोरील पटांगणात ट्रॅक्टरला जोडलेली डंपिंग ट्रॉली मागे घेत होते. यावेळी ट्रॉलीच्या मागे असलेल्या उमर अल्लाउद्दीन सय्यद (वय २) याच्याकडे दुर्लक्ष झाल्याने ट्रॉलीचे चाक त्याच्या अंगावरून गेले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी उमरचे वडील अल्लाउद्दीन कासम सय्यद यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अब्दुल सय्यद यांच्याविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.