पुणे

जुनी विहीर जतन करावी एकलहरे परिसरातील शेतकऱ्यांची मागणी

CD

घोडेगाव, ता. २२ : एकलहरे (ता. आंबेगाव) येथे हॉटेल रविकिरणच्या पुढील बाजूस मंचरच्या दिशेने जाताना राष्ट्रीय महामार्गाच्या डाव्या बाजूला सर्व्हिस रस्त्याला लागूनच ५० वर्षांपूर्वीची विहीर असून, ती राष्ट्रीय महामार्ग विभागाने हस्तांतरित केली आहे. सोमवारी (ता. २२) ठेकेदार लिंगराज यांनी विहिर बुजविण्याचा प्रयत्न केला.

येथील शेतकरी निसार शेख यांनी या विहिरीमध्ये मांगूर, पोपट मासा तसेच १५ वर्षांपूर्वीचे एक कासव आणि एक छोटे कासव अशी दोन कासव असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले होते. तरीसुद्धा अधिकाऱ्यांनी कोणताही विचार न करता जेसीबी चालकाला या विहिरीचे कठडे तोडून विहीर बुजविण्यास सांगितले. या विहिरीने मंचर शहरातील व परिसरातील लोकांची दुष्काळातही तहान भागविली होती. या विहिरीचे राष्ट्रीय महामार्गाने कठडे बांधून जतन करावे, अशी मागणी प्राणीमित्र आयुब शेख व शेतकऱ्यांनी केली आहे.

याबाबत वन वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी वनअधिकारी शशिकांत मडके व रईस मोमीन यांना पाठविले. महामार्गाचे ठेकेदार लिंगराज यांना बोलावून विहीरीतील कासवाची खात्री करूनच विहीर बुजविण्यात यावी, असे सांगितले. तसेच हे कासव वन विभागाच्या ताब्यात द्यावे अशी सूचना केली. या वेळी आयुब शेख म्हणाले, ‘‘१९७२ च्या दुष्काळामध्येही ही विहीर आटली नाही. एकलहरे हद्दीत १९६४ मध्ये युसुफ शेख यांनी खोदकाम केलेली ही विहीर आहे. १९७२ मध्ये दुष्काळी परिस्थिती असतानासुद्धा विहीर कधीही आटली नाही. सर्व्हिस रस्त्याच्या साइड पट्टीजवळ विहीरीचा कठडा येत आहे. वन अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदारांना जोपर्यंत कासवे मिळत नाहीत, तोपर्यंत विहीर बुजविण्याचे काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. तर ही विहीर बुजवू नये, अशी मागणी शेतकरी निसार शेख, राजबब्बर शेख आदी करीत आहेत.

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थळपाहणी केली आहे. कासवांचा छडा लागेपर्यंत हे काम बंद करण्यास सांगितले आहे. कर्मचाऱ्यांच्या अहवालानुसार संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.
- स्मिता राजहंस, वनपरिक्षेत्र अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT