पुणे, ता. २८ ः ‘‘महाराष्ट्रातल्या छोट्या व्यावसायिकांना जागतिक बाजारपेठेत संधी मिळू शकते. फक्त ती संधी शोधता आली पाहिजे. सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजीमुळे ही संधी शोधता आणि घेता येऊ शकते. त्यासाठी महिला व्यावसायिकांनी पुढे यावे,’’ असे आवाहन बारामती ॲग्रिकल्चरल ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी केले
‘दे आसरा’ फाउंडेशनतर्फे आयोजित ‘उद्योजक कट्टा’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘दिवसेंदिवस नोकऱ्या कमी होत आहेत. त्यामुळे उद्योग व्यवसायाकडे वळलं तरच रोजगार निर्माण होतील. महिलांनी पारंपरिक चौकट मोडून घराबाहेर पडलं पाहिजे. स्वत:च्या पायावर उभं राहिलं पाहिजे. ग्रामीण भागात अजूनही महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. महिलेच्या कुटुंबीयांनी तिच्या पाठीमागे राहिलं तर परिस्थिती बदलू शकते. भीमथडी जत्रेच्या माध्यमातून शेकडो महिला उद्योजक तयार झाल्या आहेत. या जत्रेने महिलांना फक्त व्यवसायच शिकवला नाही तर आत्मविश्वास दिला, नवं भान दिलं. त्या मार्केटिंग करायला शिकल्या, ग्राहकांशी उत्तमपणे संवाद साधायला शिकल्या, हे मोठं यश आहे. पुणेकरांच्या प्रतिसादामुळेच भीमथडीचा ब्रँड तयार होऊ शकला, असेही त्यांनी सांगितले.’’
उद्योजकता तयार करणं हे मोठं काम आहे. ‘दे आसरा’ फाउंडेशनसारख्या संस्था त्यासाठी काम करतात, ही खूपच चांगली गोष्ट आहे. शारदा महिला संघ आणि ‘दे आसरा’ फाउंडेशन ग्रामीण भागातल्या महिलांसाठी अनेक उपक्रम राबवत असल्याची माहितीही त्यांनी दिली. ‘दे आसरा’ फाउंडेशनचे अजय कौतिकवार यांनी सुनंदाताईंची मुलाखत घेतली, तर ‘दे आसरा’च्या प्रोग्रॉम मॅनेजर अस्मिता ताटके यांनी ‘दे आसरा’ फाउंडेशन आणि शारदा महिला संघ करत असलेल्या संयुक्त उपक्रमांची माहिती दिली. उपस्थित प्रेक्षकांच्या प्रश्नांनाही पवार यांनी उत्तरे दिली.
फोटो: मोहन पाटील ८४८५४
गोखले इन्स्टिट्यूट ः मुलाखतीत बोलताना बारामती ॲग्रिकल्चरल ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.