पुणे

खोदलेल्या खड्ड्याचे काम पूर्ण

CD

शिवाजीनगर, ता. २८ : मेट्रोच्या कामात मध्यभागी येत असलेली जलवाहिनी एका बाजूला घेऊन जोडण्याचे काम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील गणेशखिंड रस्त्यावर मागील अनेक दिवसांपासून सुरू होते. जलवाहिनी जोडण्यासाठी विद्यापीठ चौकात व्यावसायिकांच्या हॉटेल, दुकानांसमोर खड्डा खोदून ठेवल्याने रस्ता बंद झाला होता. याचा आर्थिक फटका स्थानिक व्यावसायिकांना होत असल्याने त्यांनी ‘सकाळ’कडे कैफियत मांडली होती. ‘वीस दिवसांनंतरही खोदलेला खड्डा ''जैसे थे'' या मथळ्याखाली ‘सकाळ’मध्ये (ता. २१) वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन युद्धपातळीवर काम पूर्ण केले. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनीदेखील प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून काम पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या.

व्यावसायिक समीर भोपळे यांनी सांगितले की, ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने तत्काळ काम पूर्ण केले. दुरुस्ती पूर्ण झाल्याने दुकानासमोरील रस्ता पूर्ववत झाला. त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टळल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला.

----------------------------------------------
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक : जलवाहिनी टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्याची दुरुस्ती करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Qualifier 1: विराट कोहलीने GT विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ची चिंता वाढवली... समोर आले धक्कादायक अपडेट्स

चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित 'गव्हर्नर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज ! मनोज वाजपेयींची मुख्य भूमिका

Alandi Temple Security : आळंदीतील दानपेटी चोरी प्रकरणानंतर देवस्थान प्रशासन सतर्क: व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांकडून खुलासा

Eid Al-Adha 2026: भारतात बकरी ईद 27 मे की 28 मे रोजी साजरी होणार? जाणून घ्या नेमकी तारीख आणि भारतात कुठे, कशी साजरी होते ईद

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरती २०२५ : पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे नोंदविण्यासाठी किमान ३० दिवस मुदतवाढ देण्याची उमेदवारांची मागणी

SCROLL FOR NEXT