पुणे

साऊंड सिस्टीम धडकून फांदी पडल्याने एकाचा मृत्यू

CD

सासवड शहर, ता. ३ : सोनोरी (ता. पुरंदर) येथे बैलपोळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान एका प्रौढाचा मृत्यू झाला. पूर्वपरवानगी न घेता लावण्यात आलेल्या साऊंड सिस्टीमच्या भिंतीचा वरचा भाग चिंचेच्या झाडाच्या फांदीला धडकला. त्यामुळे साऊंड बॉक्स डोक्यात पडून गंभीर जखमी झालेल्या प्रौढाचा मृत्यू झाला. रवींद्र चंद्रकांत रणदीर (वय ४५, रा. वरवंड) असे मृताचे नाव आहे. ते साऊंड सिस्टिमचे सहाय्यक होते. साऊंड सिस्टीम लावण्यात आलेल्या गाडीच्या बरोबर ते चालत होते. या प्रकरणी बैलमालक सौरभ पंढरीनाथ काळे, बाळासाहेब नाना काळे, साऊंड सिस्टिम मालक अभिजित बुवा दिवेकर, लखन युवराज घोडके (सर्व रा. वरवंड) यांच्यावर सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार जब्बार हारुण सय्यद यांनी फिर्याद दाखल केली. पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी अधिक तपास करीत आहेत.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Highway traffic jam : मुंबई-पुणे हायवेवर ट्रॅफिक जॅम, सुप्रिया सुळे तब्बल दोन तास अडकल्या; व्हिडिओद्वारे प्रवाशांनी साधला संवाद

आधी आक्रमक सेंडऑफ अन् नंतर विराट-गिलचा ब्रोमान्स.... GT vs RCB सामन्यानंतरचा Video Viral

Latest Marathi News Live Update : महाकालेश्वर मंदिर परिसराच्या जवळ सुरू असलेल्या उत्खनन कामादरम्यान विशाल शिवलिंग सापडले

Chandrapur: अर्पिताच्या संशयास्पद निधनची चौकशी करा; कुटुंबीयांची मागणी; जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन

Bank Holiday: मे महिन्यात 12 दिवस बँका बंद! RBI ची अपडेट; व्यवहाराआधी पाहा सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT