पुणे

जेजुरीत जिजामाता विद्यालयात विद्यार्थांना मोफत गणवेश वाटप

CD

जेजुरी, ता. १४ ः जिजामाता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज जेजुरी या विद्यालयातील गरजू, होतकरू ५० विद्यार्थांना पुणे येथील मातृ-पितृ स्मृती सपकाळ ट्रस्टच्या वतीने मोफत गणवेश वाटप करण्यात आले.

पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर, ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण सपकाळ, सचिव राजेश्री सपकाळ, पद्माकर आढाव, संगीता आढाव, प्रणव आढाव, शीतल आढाव, स्वाती तांभाळे, मंदार कदम, काव्या कदम, रोहन गावडे, अथांग गावडे, सौरभ कुंदेन, कामिनी कुंदेन, शिवांश कुंदेन, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे, अमोल बेलसरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्राचार्य नंदकुमार सागर, बी. एम. काळे, प्रवीण सपकाळ, स्वाती तांभाळे, संगीता आढाव, पद्माकर आढाव, रोहन गावडे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. कडेपठार गड पायथ्याशी वृक्षारोपण करण्यात आले. मातृ-पितृ स्मृती सपकाळ ट्रस्ट हे शहरी व ग्रामीण परिसरात काम करत आहे. ग्रामीण भागातील गरीब, गरजू, विद्यार्थी, केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणून दरवर्षी जिजामाता विद्यालयामध्ये ५० विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात येतात. तसेच शिष्यवृत्ती वाटप केली जाते. या ट्रस्टच्या वतीने जिजामाता विद्यालय परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी एक विंधन विहीर खोदून त्यावर मोटर बसवून दिली आहे.
शाळा समन्वयक प्रल्हाद गिरमे, पर्यवेक्षिका लीना पायगुडे, माध्यमिक विभागप्रमुख बाळासाहेब जगताप, सोनबा दुर्गाडे, सोमनाथ उबाळे, राजाराम पिसाळ, निर्मला निगडे, राघू हारुळे, कुलदीप साळवे, गणेश भंडलकर, सारिका थोपटे, प्राजक्ता क्षीरसागर, पूनम उबाळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सागर चव्हाण यांनी सूत्रसंचालन तर वर्षा देसाई यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

SCROLL FOR NEXT