पुणे

अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा पुरस्कार उर्जादायी जेजुरीतील पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. नीलम गोऱ्हे यांची भावना

CD

जेजुरी, ता. २५ ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य देशभर पसरले आहे. तीर्थक्षेत्रांच्या सुविधाबरोबरच सामाजिक कार्याचा त्यांचा वारसा देदीप्यमान आहे. त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार मला पुढील कार्यासाठी ऊर्जा देणारा ठरेल, अशी भावना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केल्या.
जेजुरीतील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाच्यावतीने राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान सोहळा झाला. अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी विजय कोलते होते.
वाघ्या मुरळीच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, त्याचबरोबर स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करता आल्याचा आनंद आणि समाधान आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, दिलीपआबा यादव, ममता लांडे- शिवतारे, माई कोलते, शांताराम पोमण, माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार, मुख्य विश्वस्त मंगेश घोणे, गौरव कोलते, विठ्ठल सोनवणे आदी उपस्थित होते.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या आमदार स्थानिक विकास निधीतून महाविद्यालयासाठी १० लाख रूपयांचा निधी यावेळी जाहीर केला.
भूषणसिंहराजे होळकर म्हणाले, ‘‘अहिल्यादेवी यांची प्रशासनावर उत्तम पकड होती. त्यांनी आपल्या खजिनाचा उपयोग जनकल्याणासाठी केला. केवळ मंदिराचा जीर्णोद्धर त्यांनी केला नाही तर मंदिराभोवती असणारी अर्थव्यवस्थाही विकसित केली.’’
विजय कोलते म्हणाले, ‘‘महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये अहिल्यादेवी होळकर ट्रस्टचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळे आम्हाला हे महाविद्यालय उभे करता आले. अहिल्यादेवी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी, या हेतूने आम्ही त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू केला आहे.’’
प्राचार्य डॉ. धनाजी नागणे यांनी स्वागत केले. सन्मानपत्राचे वाचन शांताराम पोमण यानी केले. बंडूकाका जगताप यांनी आभार मानले. प्रा. डॉ. अरूण कोळेकर यांनी सूत्रसंचालन केले.


फोटो ः 03180.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

American Airlines Flight : उड्डाण करतानाच विमानाच्या लॅंडिंग गियरमध्ये आग, १७३ प्रवाशांसह ६ क्रू मेंबर्सचा जीव टांगणीला अन्...

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

Latest Maharashtra News Updates: हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू

Pune Traffic : गणेशोत्सवाच्या तयारीसोबत खरेदीची गर्दी; पुण्याच्या मध्यवर्ती भागांत वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT