पुणे

कोंडवे - जिद्दीसमोर अशक्य काहीच नाही —साठाव्या वर्षी दहावी उत्तीर्ण होऊन महिलेची प्रेरणादायी झेप

CD

वयाच्‍या साठीत दिला
इच्‍छाशक्‍तीचा प्रत्‍यय

कोंडवेतील उषा पवार दहावीत उत्तीर्ण

किरण गाडे : सकाळ वृत्तसेवा

कोंडवे, ता. ११ : स्वप्न पूर्ण करण्यासाठी वय नाही, तर इच्छाशक्ती महत्त्वाची असते, असा कृतिशील संदेश देत कोंडवे (ता. सातारा) येथील उषा रामदास पवार यांनी वयाच्या साठाव्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
त्या सध्या बेबलेवाडी येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. आयुष्यातील अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना शिक्षण अपूर्ण राहिले होते. मात्र, शिक्षणाची ओढ आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द कायम मनात होती.
उषा पवार यांनी शिक्षणाला वयाची मर्यादा नसते, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. आयुष्यभर संसार, कुटुंब आणि जबाबदाऱ्या सांभाळताना अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न त्यांनी अखेर जिद्दीच्या बळावर साकार केलं. घरातील जबाबदाऱ्या, संसार आणि विविध अडचणींचा सामना करत त्यांनी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली, वेळेची कमतरता आणि वाढतं वय यांचा विचार न करता त्यांनी पुन्हा पुस्तक हातात घेतलं. नियमित अभ्यास, अथक मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी दहावीच्या परीक्षेत यश मिळवले. त्यांच्या या यशामुळे परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, अनेकांसाठी त्या प्रेरणास्थान ठरत आहेत.
उषा पवार यांच्या या यशामुळे अनेक महिलांना, गृहिणींना आणि ज्येष्ठ नागरिकांना नव्याने शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळत आहे. त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
...............................................
फोटो :..........KDV26A00300
कोंडवे : उषा पवार
.................................................

Petrol-Diesel Stock India: देशात पेट्रोल-डिझेलचा साठा किती दिवसांचा? केंद्र सरकारने जनतेला दिली स्पष्ट माहिती

IPL 2026 Controversy: टीम डेव्हिडला अखेर शिक्षा मिळाली! BCCI ने "अश्लील हातवारा" करणाऱ्या RCB च्या फलंदाजाला घडवली अदद्ल...

Thane Metro: मेट्रोचा प्रवास लांबणार! ठाण्यात चाचणीचा डबा धूळखात; पायाभूत सुविधांचे काम अर्धवट

Fuel Shortage: नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर सरकारचे मोठे स्पष्टीकरण; पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाची माहिती समोर

Latest Marathi News Live Update: अंत्यविधीसाठी पैसे काढण्यास एटीएममध्ये गेलेल्या मुलाला लुबाडले

SCROLL FOR NEXT