पुणे

लोणावळा परिसरात पर्यटकांवर निर्बंध जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे प्रतिबंधात्मक आदेश

CD

लोणावळा, ता. ११ ः लोणावळा परिसरातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी हे आदेश दिले आहेत.
लोणावळा परिसरातील एकवीरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोना किल्ला, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, शिवलिंग पॉइंट, पवना धरण या परिसरात प्रामुख्याने पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. अशावेळी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून संबंधित ठिकाणी हे आदेश लागू करण्यात आले आहेत.
सध्या पावसाळा हंगाम सुरु झाला असून, देश विदेशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक लोणावळा व परिसरात भेट देण्यासाठी येत आहेत.
वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी लोणावळा पोलिस ठाणे हद्दीतील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांची पाहणी केली होती. लोणावळा परिसरात रस्ते अपघात तसेच पर्यटक बुडाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पर्यटक, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत
परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांकडून लागू केलेले निर्बंध पुढीलप्रमाणे:
१. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे व पोहणे.
२. धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे
३. पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, डोंगरदऱ्या, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरूपाचे चित्रीकरण करणे.
४. पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य वाहतूक, विक्री करणे, उघड्यावर मद्य सेवन करणे.
५. वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे,
६. वाहन अतिवेगाने अथवा वाहतुकीस अडथळा होईल अशा वेगाने चालविणे.
७. बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे.
८. सार्वजनिक ठिकाणी खाद्य पदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लॅस्टिकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे.
९. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात डीजे, स्पीकर वाजवणे
१०) धबधबे, धरणे परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OCI Card New Rule: नागरिकत्व नियमांत मोठा बदल! अल्पवयीन मुलांच्या पासपोर्टवर मोठी बंदी; OCI साठी नवे डिजिटल नियम लागू

Navi Mumbai Drug Racket : शांताबाई करंडेकर टोळीचा गेम ओव्हर! दिघ्यात लेडी डॉनचं साम्राज्य उद्ध्वस्त करत पोलिसांनी अवैध मालमत्तेवर फिरवला बुलडोझर

Latest Marathi News Live Update : बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू, रुग्णांना मोठा दिलासा

Mumbai: प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच! प्लॅटफॉर्म- लोकलमधील अंतराचा धोका; अनेक स्‍थानकांवर उपाययोजनांकडे दुर्लक्ष

महिन्यात राज्यभरात १४ भोंदूबाबांवर गुन्हे, खरात प्रकरणानंतर प्रकार उघड

SCROLL FOR NEXT