पालखी मुक्काम मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी
बाजारतळ ते मुक्काम स्थळापर्यंत पथदिव्यांचीही गरज; महिला वर्गातून आवाज
सकाळ वृत्तसेवा
माळशिरस, ता. १२ : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान बाजार तळ ते पालखी मुक्काम स्थळापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करून पथदिव्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शहराबाहेरील मुक्कामस्थळी थांबत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. मात्र बाजार तळ ते मुक्काम स्थळादरम्यानचा रस्ता अरुंद असल्याने भाविकांची मोठी गैरसोय होते. पालखी सोहळ्यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना व्यापारी दुकाने थाटत असल्याने दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांना व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
या मार्गाच्या दोन्ही बाजूंना मोकळी जागा उपलब्ध आहे. पूर्वी नगरपंचायतीचा कचरा या ठिकाणी टाकला जात होता. मात्र आता नगरपंचायतीने अन्यत्र जागा उपलब्ध केल्याने ही जागा रिकामी आहे. या जागेचे मुरमीकरण व सपाटीकरण करून रस्त्याचे रुंदीकरण केल्यास पालखी काळात वाहतूक आणि भाविकांची ये-जा अधिक सुलभ होऊ शकते. पालखी सोहळ्यापूर्वीच हे काम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. गतवर्षी तत्कालीन नगराध्यक्ष विजय देशमुख यांनी या ठिकाणी दोन मर्क्युरी टॉवर उभारून प्रकाशाची व्यवस्था केली होती.
कोट
- याठिकाणी रस्ता रुंद करून दिवे लावल्यास माऊलींच्या दर्शनासाठी जाताना अडचण येणार नाही. विशेषतः महिलांना सुरक्षितपणे ये-जा करता येईल.”
- नंदा पंचवाघ, नागरिक, माळशिरस
- रस्ता रुंद झाल्यास भाविकांची मोठी सोय होईल. यासाठी नगरपंचायतीमार्फत पाठपुरावा करण्यात येईल.
- सुमित जाधव, मुख्याधिकारी, नगरपंचायत माळशिरस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.