पुणे

वाहनतळाच्या जागेसाठी मयुरेश्वर पतसंस्था आक्रमक

CD

मोरगाव, ता. ८ : मोरगाव (ता. बारामती) येथे वाहनतळासाठी संपादित केलेल्या जागेवर नियमांचे उल्लंघन करून भक्तनिवासाचे बांधकाम सुरू असल्याचा आरोप श्री मयूरेश्‍वर पतसंस्थेने केला आहे. ही जागा मूळ मालक असलेल्या पतसंस्थेला १५ दिवसांत परत करावी, अन्यथा न्यायालयात धाव घेण्याचा इशारा संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रेय ढोले यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
मोरगावमध्ये भाविकांच्या सोयीसाठी काही वर्षांपूर्वी खासगी जागांचे संपादन करण्यात आले होते. यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेली मयूरेश्‍वर पतसंस्थेची जागा वाहनतळासाठी घेण्यात आली होती. मात्र, सध्या या जागेवर ग्रामपंचायतीने भक्तनिवासाचे काम सुरू केले आहे. ज्या कारणासाठी जागा संपादित केली, तो उद्देश सोडून दुसऱ्या कारणासाठी वापर करणे हा शर्तभंग असल्याचे ढोले यांनी सांगितले.
संस्थेचे १५०० सभासद असून जिल्हा कार्यक्षेत्र असल्याने हक्काच्या इमारतीची गरज आहे. यापूर्वी ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद स्तरावर तक्रार करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. सध्या इमारतीचे छतापर्यंत काम पूर्ण झाले असून, प्रशासनाने यावर १५ दिवसांत लेखी खुलासा करावा किंवा जागा परत करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

पूर्वी वाहनतळासाठी संपादित केलेली जागा आणि त्यावर सुरू असलेले भक्तनिवासाचे काम यासंदर्भात श्री मयूरेश्‍वर पतसंस्थेकडून झालेल्या तक्रारीसंदर्भात काय मार्ग काढायचा यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन घेतले जाईल.
- दीपक बोरावके, ग्रामविकास अधिकारी, मोरगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT