पुणे

ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचे निधन

CD

पुणे, ता. १० ः गेली पाच दशके अविरतपणे रंगभूमीची सेवा करणारे, ‘रंगभूषाकार’ नव्हे तर ‘रंगभाषाकार’ हे बिरूद सार्थ करणारे आणि नाट्यकर्मींचे लाडके ‘भावेकाका’ ज्येष्ठ रंगभूषाकर प्रभाकर नीलकंठ भावे (वय ७८) यांचे मंगळवारी पहाटे पुण्यात राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

भावे यांची रंगभूषाकार म्हणून सुमारे ५५ वर्षांची कारकीर्द होती. मूळचे साताऱ्याचे असलेल्या भावेंना लहानपणापासून नाटक, संगीत, साहित्य आदींची आवड होती. परंतु, साताऱ्यामध्ये त्यांच्या कलेला पुरेसा वाव नसल्याने ते पुण्यात आले आणि इथेच रमले. महाराष्ट्रातील सर्व नावाजलेल्या नाट्य स्पर्धांशी ते रंगभूषाकार म्हणून संबंधित होते. मुखवटे तयार करण्यात त्यांचा हातखंडा होता. अनेक वर्षे पुरुषोत्तम स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची रंगभूषा भावे नियमितपणे करत असत. त्यांनी लिहिलेले ‘रंगभूषा’ नावाचे पुस्तक पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले होते. या पुस्तकाला राज्य सरकारचा तत्कालीन वर्षाचा उत्तम साहित्यकृतीचा पुरस्कार मिळाला होता. चांगला रंगभूषाकार होण्यासाठी चित्रकला आणि शिल्पकलेचे ज्ञान आवश्‍यक आहे. तसेच वाचनाची गोडीही हवी. त्याशिवाय, रंगांच्या माध्यमातून व्यक्तिरेखा उभी करता येत नाही. पण व्यक्तिरेखेनुसार योग्य रंगभूषा करता आली तर कलाकार खुलतो. त्याचा परिणाम अभिनयावर होतो. म्हणून मला रंगभूषा हा नटाला खुलवणारा मानसोपचारच वाटतो, या भूमिकेतून भावे यांनी या क्षेत्राकडे पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Heat Wave : विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT