पुणे

संप मिटेना उपचार काही होईना ससूनमधील अस्थिरोग विभागातील नियोजित शस्त्रक्रिया रखडल्या

CD

पुणे, ता. १७ : ‘‘गुडघेदुखीने जीव कासावीस होत होता. उपचारासाठी ससून रुग्णालयाचा रस्ता धरला. गेल्या चार दिवसांपासून हेलपाटे मारत आहे. गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले होते. कधी, कशी शस्त्रक्रिया करायची ते ठरवायचे होते. पण संप सुरु झाला. चार दिवस झाले तरी संप काही मिटेना आणि उपचार काही होईना,’’ असे रुग्णाचे नातेवाईक अमर परब यांनी सांगितले.

कासेवाडी येथे राहणाऱ्या परब यांनी त्यांच्या जवळच्या नातेवाइकाला उपचारासाठी ससून रुग्णालयात आणले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘रुग्णाच्या रोगनिदानासाठी चाचण्या झाल्या. त्यातून शस्त्रक्रिया करावी लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यासाठी परत बोलविले होते. इतक्यात संप सुरू झाला. आता रोज येतो पण, उपचार काही पुढे जात नाहीत. गुडघेदुखीने रुग्णाचा जीव मात्र कासावीस होतो.’’

जुने निवृत्तिवेतन मिळण्याच्या प्रमुख मागणीसाठी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे ससून रुग्णालयातील परिचारिका, तंत्रज्ञ आणि कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. संपाच्या चौथ्या दिवशीही फारसे कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत. त्याचा फटका नियोजित शस्त्रक्रियांना बसत असल्याचे चित्र रुग्णालयात दिसले. याबाबत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर म्हणाले, ‘‘रुग्णालयातील आपत्कालीन रुग्णसेवा सुरळीत राहील, याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे अपघात, प्रसूती, जीवरक्षक शस्त्रक्रिया नियमित सुरू आहेत.’’

‘‘परिचारिकांना पर्यायी व्यवस्था उभारण्यात येत आहे. त्यासाठी गुरुवारपासून शंभर परिचारिका तात्पुरत्या स्वरुपात करार पद्धतीने नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यातून ६० परिचारिका कामावर रुजू झाल्या आहेत. आणखी ५० परिचारिका नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, ससून रुग्णालयातून निवृत्त झालेल्या परिचारिकांनाही परत सेवेत दाखल होण्याचे आवाहन करण्यात आले आहे,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

ससूनमधील रुग्णसेवा दृष्टिक्षेपात
बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण : १२७६
आंतररुग्ण विभागात दाखल रुग्ण : ९२८
दिवसभरात दाखल झालेले रुग्ण : १२८
एक्स रे : ५९८
सीटीस्कॅन : ४०
एमआरआय : १३
मॅमोग्राफी : २
मोठ्या शस्त्रक्रिया : १३
लहान शस्त्रक्रिया : २४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT