Pune Municipal Corporation sakal
पुणे

Pune Municipal : तृतीयपंथीयांना पुणे महापालिकेत मिळणार नोकरीची संधी; अशी असणार जबाबदारी...

पुणे महापालिकेने सर्वांना समानतेची वागणूक देण्याच्या उद्देशाने तृतीयपंथीयांना महापालिकेच्या सेवेत घेत त्यांनाही न्याय दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे महापालिकेने सर्वांना समानतेची वागणूक देण्याच्या उद्देशाने तृतीयपंथीयांना महापालिकेच्या सेवेत घेत त्यांनाही न्याय दिला आहे.

पुणे - महापालिकेच्या विविध विभागांमधील कामाला गती यावी, यासाठी प्रशासनाने मनुष्यबळ घेण्यास प्राधान्य दिले. एकीकडे कुशल मनुष्यबळ घेतानाच महापालिकेने सर्वांना समानतेची वागणूक देण्याच्या उद्देशाने तृतीयपंथीयांना महापालिकेच्या सेवेत घेत त्यांनाही न्याय दिला आहे. महापालिकेच्या मिळकतींचे संरक्षण करण्यासाठी २५ तृतीयपंथीयांना प्रायोगिक तत्त्वावर कंत्राटी पद्धतीने नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

महापालिका प्रशासनाकडून काही महिन्यांपूर्वी विविध विभागासाठी भरती प्रक्रिया राबवून कुशल मनुष्यबळ भरती केले होते. दरम्यान, महापालिकेच्या सुरक्षा विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कामासाठी तृतीयपंथीयांना प्राधान्य देण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाची तातडीने दखल घेत महापालिका आयुक्त विक्रम विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी २५ तृतीपंथीपयांना तातडीने ठेकेदारामार्फत कामावर रुजू करून घेण्यास व उर्वरितांना टप्प्याटप्प्याने कामावर रुजू करून घेण्यास सांगितले होते.

संबंधित तृतीयपंथी नागरिकांकडून महापालिकेच्या विविध ठिकाणाच्या मिळकतींची संरक्षण करण्यासाठी नियुक्ती करणार आहे. त्यामध्ये कमला नेहरू रुग्णालय, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, मनपा भवन, अनधिकृत बांधकाम निर्मूलन व अतिक्रमण विभागाच्या कामाकरिता त्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

लोकाभिमुख उपक्रम राबविण्यावर भर
शहरात तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या समिती तयार करून त्याद्वारे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि तृतीयपंथी यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण करत जनजागृती करण्यावर भर देणार आहे. भविष्यात तृतीयपंथीय नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लोकाभिमुख उपक्रम राबविण्यावर भर देणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Payment: यूपीआय पेमेंटला 'चार्ज' लागणार का? केंद्र सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण; मोठ्या व्यापाऱ्यांसाठी वेगळा नियम

संसदेत बाजी पलटणार? मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर भाजपला मिळाली जुन्या मित्र पक्षाची साथ, मोठ्या पक्षाचा NDA ला पाठिंबा

Latest Marathi News Live Update : पुन्हा एकदा पुणेरी बॅनर चर्चेत... आगळ्या -वेगळ्या पद्धतीने सरकारचा निषेध

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! पुढचे दोन दिवस महत्त्वाचे, बैठकांना सुरुवात; 'हे' 5 मुद्दे गाजणार

रेल्वे पुनर्वसन प्रकल्पासाठी जागा मोकळी करणे आवश्यक; गणेश नगर-मेघवाडी कारवाईवर DRP चं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT