Plane Landing
Plane Landing sakal
पुणे

Plane Landing : विमानांचे महामार्गावरही होणार लँडिंग ; आंध्र प्रदेशातील ‘ईएलएफ’चा भारतीय हवाई दलाकडून वापर सुरू

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय हवाई दलाच्या लढाऊ आणि मालवाहू विमानांचे लँडिंग आता थेट महामार्गांवर होणार आहे. यासाठी आंध्र प्रदेशच्या बापटला जिल्ह्यातील अद्दनकी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग १६ वर असलेल्या ‘आपत्कालीन लँडिंग सुविधे’चा (ईएलएफ) वापर सुरू करण्यात आला आहे. महामार्गावर सुरू झालेल्या ‘ईएलएफ’मुळे विविध कारवायांमध्ये हवाई परिचालनातील लवचिकता वाढविण्यास मदत मिळणार आहे.

हवाई दलाच्या विमानांद्वारे नुकतेच ‘ईएलएफ’च्या वापरादरम्यान ‘सुखोई ३०’ आणि हॉक या लढाऊ विमानांनी या परिसरावर यशस्वीपणे भराऱ्या मारल्या. त्याचबरोबर या प्रक्रियेदरम्यान एएन-३२ व डॉर्नियर मालवाहू विमानांनी या धावपट्टीवरून उड्डाण घेऊन लँडिंगदेखील केले. ही प्रक्रिया पार पाडताना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), जिल्हा प्रशासन, राज्य पोलिस दल अशा नागरी संस्था, तसेच हवाईदलातील समन्वय दिसून आला. या आधी २०२२मध्येही अशी प्रक्रिया राबविण्यात आली होती.

महामार्गावर साकारण्यात आलेल्या ‘ईएलएफ’मुळे आपत्कालीन परिस्थितीत, नैसर्गिक आपत्ती अशा विविध स्थितीमध्ये हवाईदलाला मोहिमा राबविण्यास मदत मिळते. अशा धावपट्ट्या दुर्गम भागांमध्ये मानवतावादी मदत व आपत्ती निवारण मोहिमांसाठी अत्यंत उपयुक्त मालमत्ता ठरतात. देशभरात आवश्यक ठिकाणी अशाच ‘ईएलएफ’ची उभारणी करण्याच्या दिशेने हवाईदल आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (एमओआरटीएच) संयुक्तपणे काम करत आहे.

‘ईएलएफ’बाबत

  • राष्ट्रीय महामार्ग १६ वर ४.१ किलोमीटर लांब आणि ३३ मीटर रुंद धावपट्टीची निर्मिती

  • ‘एनएचएआय’द्वारे धावपट्टीच्या निर्मितीसाठी भारतीय हवाई दलाच्या निर्देशित तपशिलांचे पालन

  • देशाच्या इतर भागांतील अशा धावपट्ट्यांचा वापर यापूर्वीच सुरू झाला आहे

  • भारतात नुकतेच आंध्र प्रदेशात या ईएलएफचा वापर सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

IPL 2024 RR vs KKR Live Score: तब्बल तीन तासांच्या विलंबानंतर राजस्थान-कोलकाता संघात 7-7 ओव्हरचा सामना; श्रेयस अय्यरने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT