पुणे

विद्येच्या प्रांगण

CD

दळवीनगर शाळेत पालखी सोहळा
पुणे : दळवीनगर येथील आदर्श प्राथमिक विद्या मंदिरतर्फे पालखी सोहळा साजरा करण्यात आला. सोहळ्यासाठी विठ्ठल रखुमाईच्या वेशभूषेतील विद्यार्थी तसेच वारकरी वेशभूषा करून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरा विठ्ठलमय होऊन प्रत्यक्ष अनुभवली. सोहळ्यामध्ये आरती, पालखी भोवती अश्व रिंगण, टाळ-चिपळ्यांच्या तालात तसेच विविध अभंगांनी सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांसोबत शिक्षक व मुख्याध्यापक यांनीही टाळ वाजवत अभंगांवर ठेका धरला. या सोहळ्यासाठी संस्थेच्या सचिव सविता बारवकर, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

कदम प्रशालेतर्फे पालखीचे पूजन
पुणे : एरंडवणे येथील भारती विद्यापीठाच्या विजयमाला कदम कन्या प्रशालेतर्फे पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. मुख्याध्यापिका वंदना देशमुख यांच्या हस्ते पालखीचे पूजन
करण्यात आले. सोहळ्यात विद्यार्थिनींनी अभंग व टाळ मृदुंगाच्या नादावर रिंगण घातले. पालखी हनुमाननगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सहावीच्या वर्गातील गार्गी मारणे या विद्यार्थिनीने ओवीवर निरूपण सादर केले. यावेळी शिक्षिका एल. के. महाडिक, ए. टी. पाटील व सर्व शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. आर. मोरे यांनी केले. आर. बी. सानप यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे छायाचित्रण जे. टी. कुंभार यांनी केले.

विश्वकर्मा विद्यालयात पथनाट्य, अभंग
पुणे : बिबवेवाडी विश्वकर्मा मराठी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यंदाची आषाढी एकादशी वारी वेगळ्या पद्धतीने साजरी केली. यामध्ये समाजातील महिला सुरक्षाबाबत जागृती व्हावी जनजागृती व्हावी या दृष्टीने महिला सुरक्षा काळाची गरज या विषयावर आधारित पथनाट्यातून लोकांना संदेश पोचविण्यात आला. महिलांची सुरक्षा यांचा सन्मान करणे आपली जबाबदारी
आहे, अशा आशयाचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. संगीत शिक्षिका साक्षी काळे आणि गीत मंच यांनी अभंगरचना सादर केल्या. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः पखवाज वादन, पेटीवादन, टाळवादन केले. शाळेच्या संस्था अध्यक्षा डॉ. तृप्ती अग्रवाल तसेच संचालिका मधू शितोळे, मुख्याध्यापिका सुनंदा सरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यवती कांबळे, स्वाती अंधारे व सुप्रिया नाईक या शिक्षकांच्या
नियोजनातून उपक्रम पार पडला.

‘मएसो’तर्फे पालखी दिंडी
पुणे : ‘मएसो’ मुलांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे शाला समिती अध्यक्ष दिलीप शेठ, मुख्याध्यापक सायसिंग वसावेसर, उपमुख्याध्यापिका मार्गसिद्ध पवार, पर्यवेक्षिका रसिका लिमये, शिक्षक पालक संघाचे सदस्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व
विद्यार्थी उपस्थित होते. शेठ यांनी पंढरीची वारी, पालखी सोहळा, ज्ञानेश्वरी तसेच वारकऱ्यांची शिस्त सांगितली. त्यानंतर पालखीचे पूजन होऊन शालेय परिसरामध्ये पालखी दिंडी काढली. सूत्रसंचालन पूजा नांगरे, आषाढी एकादशीची माहिती अनघा बोत्रे यांनी सांगितली. सहावीच्या वर्गातील लोंढे याने सुश्राव्य अभंग सादर केला.

सेंट जोसेफमध्ये पालक-शिक्षक संघ सभा
पुणे : पूना डायोशन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत घोरपडी येथील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी पालक-शिक्षक संघाची सभा आयोजित केली होती. पालकांचे व शाळा व्यवस्थापक यांचे शाळेच्या शिक्षिका मार्गारेट थॉमस यांनी स्वागत केले. त्यानंतर पालक-शिक्षक संघाची जबाबदारी, स्वरूप व रचना स्पष्ट करण्यात आली. या सभेत शिक्षक पालक संघाची स्थापना करण्यात आली. या समितीत अध्यक्षपदी फादर धिरावियम, उपाध्यक्ष मुख्याध्यापिका ॲनी सिक्वेरा व मिसबा शेख, सचिव पल्लवी बनसोडे, उपसचिव अब्रार शेख व नीलम हस्पेटाला, खजिनदार जसींटा जोसेफ, उपखजिनदार मीनल शर्मा यांचा समावेश आहे. शिक्षिका जसींटा जोसेफ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कुरेशी स्कूलमध्ये वारकऱ्यांची सेवा
पुणे : रामटेकडी येथील लेडी जुबेदा कुरेशी प्राथमिक व माध्यमिक इंग्लिश स्कूलमध्ये योगदिन व पालखीचा मुक्काम असलेल्या शाळेसमोरील विठ्ठल मंदिरात आलेल्या वारकरी समुदायातील व
भक्त मंडळींचे शाळेच्या विद्यार्थ्यांकडून पारंपरिक पद्धतीने पुष्पहार, तुळशीपत्र व ओवाळणी करून सन्मान करण्यात आला. या भक्तांसाठी शाळेच्या वतीने नाश्त्याची, चहाची व पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेत वारकऱ्यांच्या सेवेसाठी पाणी वाटप, अन्न वाटप आणि साफसफाईची जबाबदारी घेतली होती, असे संचालिका मेहेजबीन खान यांनी सांगितले.

ज्ञानेश्वर विद्यालयातर्फे दिंडी उत्साहात
पुणे : माईर्स एमआयटीच्या श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. विठ्ठल रुक्मिणीसह ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, जनाबाई अशा सर्व संतांचा वेश परिधान करून विद्यार्थी आले होते. विठ्ठलाची आरती केल्यानंतर पादुका पालखीमध्ये ठेवून दिंडीला सुरुवात झाली. टाळ हातात घेऊन वारकरी बनून विद्यार्थ्यांनी उत्साहाने दिंडीत सहभाग घेतला. झेंडे हातात घेऊन रिंगण केले. तसेच भजन आणि टाळ मृदंगाच्या गजराने वातावरण भारावून गेले. मुख्याध्यापक नागनाथ सानप, उपमुख्याध्यापक बाबूराव दोडके व शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका देवयानी पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT