पुणे

वर्षभर फरारी आरोपी पोलिसांच्या ताब्यात

CD

पुणे, ता. २४ : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर वर्षभर फरार झालेल्या अल्पवयीन मुलास गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्यात आली.
मागील वर्षी २२ जुलै रोजी मंगळवार पेठेतील मोदी पेट्रोल पंपाजवळ टोळक्याने एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यातील आरोपी सराईत गुन्हेगार होते. दरम्यान, फरासखाना पोलिसांनी सहा जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध ‘मकोका’नुसार कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर सराइतांबरोबर असलेला अल्पवयीन साथीदार मागील एक वर्षापासून पसार झाला होता. त्याच्या मागावर असणाऱ्या पोलिसांना तो नाना पेठेत एका मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची खबर गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलिस कर्मचारी नीलेश साबळे व शुभम देसाई यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्यास फरासखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक कुमार घाडगे, सहायक निरीक्षक दीपक बर्गे, विनोद शिंदे, नीलेश साबळे, शुभम देसाई यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात सुरु होणार ५ नवीन न्यायालयं, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

Vaibhav Sooryavanshi All Records: वैभव सूर्यवंशीने गेल्या वर्षभरात मोडलेत ९ वर्ल्ड रेकॉर्ड्स! जाणून घ्या एका क्लिकवर.. तुम्हाला यातले किती माहित होते?

Latest Live Updates Marathi : आधीच्या सरकारांच्या काळातही पेपर फुटण्याच्या घटना घडल्या : जितेंद्र सिंह

BSNL Network Issue in Sangli : BSNL जिल्ह्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर? 538 पैकी अवघ्या 82 गावांत फायबर; 'कनेक्टिंग इंडिया'च्या नाऱ्याला मोठा धक्का!

Suraj Sakhare Attack : वडिलांचा पराभव अन् रस्त्याचं काम बंद पाडल्याचा राग! गुंड सूरज साखरेवरील गोळीबार महापालिका राजकारणातून; गणेश खाडेनं शूटरांना दिलेलं ॲडव्हान्स एक लाख

SCROLL FOR NEXT