पुणे

आयआयएमचे स्वतंत्र केंद्र पुण्यात हवे : मोहन जोशी

CD

पुणे, ता. २९ : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे (आयआयएम) स्वतंत्र केंद्र होण्याऐवजी उपकेंद्र पुण्यात होणार, ही घोषणा निराशाजनक आहे. भाजपचे सरकार पुण्याला नेहमी दुय्यम वागणूक का देत आहे, असा प्रश्न माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना केला आहे.
पुण्याला स्वतंत्रपणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची गरज आहे. येथील उद्योजक, आयटी तज्ज्ञ आणि अभ्यासकही ही मागणी करत आहेत. मात्र, आयआयएमचे स्वतंत्र केंद्र पुण्यात न झाल्याने आयटी क्षेत्रातही नाराजीच्या प्रतिक्रिया आहेत. पुण्यात जागा, शैक्षणिक वातावरण, शिक्षण तज्ज्ञ उपलब्ध असताना यापूर्वीच पुण्यात हे केंद्र उभे राहायला हवे होते. पण नागपूर, मुंबईमध्ये हे केंद्र उभे राहिले, पुण्यात मात्र उपकेंद्र उभे राहत आहे, अशी खंत जोशी यांनी व्यक्त केली.
मोहोळ यांचा आयआयएमचे उपकेंद्र पुण्यात आणण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. प्रत्यक्षात ही गोष्ट निराशाजनक असल्याचे जोशी यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : पुणे जिल्ह्यात नराधमाचा अमानुषपणा! चिमुरडीच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; आरोपीला मिळणार मृत्यूदंडाची शिक्षा?

Latest Marathi News Live Update : बच्चू कडू प्रकरणावर प्रा. ज्योती वाघमारे यांचा उबाठावर जोरदार पलटवार

IPL 2026: वैभव सुर्यवंशीला खतरनाक लूक देणाऱ्या जेमिन्सला शिक्षा! BCCI ची कारवाई

Mumbai: एक्स्टॅसी पुरवणारा खेमलानी अटकेत, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांची कारवाई

Bargi Dam Accident: क्रूझ कापून वाचवले जीव! मृतांच्या कुटुंबीयांना भेटून मुख्यमंत्री भावूक, बरगी धरण अपघातावर कठोर कारवाईची तयारी

SCROLL FOR NEXT