पुणे

ब्राम्हण समाजाने वाढवला जातीय सलोखा एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन ः ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या पुरस्काराचे वितरण

CD

पुणे, ता. १२ : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्राम्हण समाजातील अनेकांनी प्राणाची आहुती दिली आहे. त्यांचे हे योगदान विसरता येणार नाही. ब्राम्हण समाज धर्माचा अर्थ कर्मकांडाच्यापुढे नेवून, जातीय सलोखा वाढवण्याचे काम करत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात शिंदे बोलत होते. समाज भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक मनोज जोशी यांना तर समाजस्नेह पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माणिकप्रभू संस्थानचे पीठाधीश माणिकप्रभू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. युवा गौरव पुरस्कार अर्थविषयक जागृती करणाऱ्या सनदी लेखापाल रचना रानडे, उद्योगरत्न पुरस्कार पूना गाडगीळ सराफ पेढीचे सिध्दार्थ गाडगीळ यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ज्योतिषाचार्य अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ब्राम्हण जागृती सेवा संघाचे संस्थापक अंकित काणे व्यासपीठावर उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, ‘‘हा पुरस्कार सामाजिक एकोपा, सामाजिक समरसता, बंधुभाव वाढवण्यासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो. मी कुठलेही काम हे पुरस्काराच्या अपेक्षेने केले नाही, ते सर्वसामान्यांच्या हितासाठी केले आहे.’’
परशुराम आर्थिक विकास महामंडळ याला चालना देऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.
माणिकप्रभू महाराज म्हणाले, ‘‘समाजाला जागृत करण्याचे काम ब्राम्हण करतात. मात्र, आज ब्राम्हण खरोखर झोपलेला आहे. ब्राम्हण समाजामध्ये एकी नसल्याचा फायदा इतरांकडून घेतला जातो. त्यामुळे सर्व ब्राम्हणांनी एकत्र यायला हवे.’’

जोशी म्हणाले, ‘‘जगात अनेक संस्कृती आल्या व संपल्या. सनातन संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न मुघल, इंग्रज यांनी केला पण हजारो वर्षापासून सनातन जी सतत नवीन असणारी संस्कृती आहे. ती कायम टिकली. ब्राम्हण ही जात नसून संस्कार आहे. ’’
ब्राम्हण समाजासाठी असलेले परशुराम आर्थिक विकास महामंडळ अधिक बळकट करण्याचे आवाहन अंकित काणे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केले. रचना रानडे यांनी आर्थिक साक्षरतेबाबत माहिती दिली. गाडगीळ यांनी पूना गाडगीळ सराफी पेढीबाबत माहिती दिली.

-----------------
गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही
माजी आमदार रवींद्र धंगेकर हे गुन्हेगारीवरून भाजपवर टीका करत आहेत. त्यावरून धंगेकर यांची त्यांच्या नेत्याकडे तक्रार केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले होते. याबाबत पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘धंगेकर यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. त्यांना मी महायुतीत दंगा नको, असे समजावून सांगितले आहे. तसेच पुण्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. त्यासाठी कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही. पोलिस सक्षमपणे काम करत आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सरसकटऐवजी अटींवर बोट ठेवून नुकसानीचे पंचनामे; उसाच्या भरपाईसाठी पूर्ण पीक पाण्याखाली असण्याची अट; दिवाळीपूर्वी मदत देण्यासाठी लगबग

Jowar Flour Uttapam Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी आणि टेस्टी ज्वारीचा उत्तप्पा, सोपी आहे रेसिपी

सावधान..! CCTV, सुरक्षारक्षक नसलेली घरे चोरट्यांकडून टार्गेट; पळून जाताना ‘गुगल मॅप’चा आधार; पोलिसांकडे गस्त वाढविण्याची मागणी, पण...

PAK vs SA Test: 'आता हा ड्रामा करणार!' बाबर आझमच्या DRS वेळी रमीज राजाने लाईव्ह सामन्यात काढली लाज? पाहा Video

INDW vs AUSW, World Cup: भारताचा सलग दुसरा पराभव! एलिसा हेलीच्या ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठे लक्ष्य पार करत घडवला इतिहास

SCROLL FOR NEXT