पुणे

पानगाव येथे आठवडाभरात आगीची दुसरी घटना,शेतकरी चिंतेत

CD

PGN26B01385
पानगाव (ता. बार्शी) ः आगीमुळे सुभाष जाधव या शेतकऱ्यांच्या कडब्याच्या गंजीची झालेली अवस्था.

पानगाव परिसरात आठवड्यात दुसरी कडब्याची गंज जळाली

पानगाव, ता. ११ : कडब्याची गंज पेटल्याची आणखी एक घटना पानगाव (ता. बार्शी) येथे घडली. आठवडाभरात परिसरातील दोन ठिकाणी कडब्याच्या गंजी आगीच्या भक्षस्थानी पडल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावातील शेतकरी सुभाष तुकाराम जाधव यांच्या गावालगतच्या जागेत सुमारे चार ते साडेचार हजार पेंड्यांची कडब्याची गंज लावलेली होती. रविवारी (ता. १०) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागून कडब्याने पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला तसेच बार्शी येथील अग्निशमन दलाला माहिती दिली.
काही वेळानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी जनावरांचा संपूर्ण चारा जळून खाक झाला. तसेच कांद्याची पोती व भुईमुगाच्या शेंगांची काही पोतीही आगीत जळाली. या आगीत सुभाष जाधव यांचे सुमारे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, शुक्रवारी (ता. ८) गावातीलच शेतकरी विलास वलगुडे यांचीही कडब्याची गंज पेटली होती. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे दोन्ही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या समोर जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR 4 Rule: करदात्यांसाठी मोठा नियम! ITR-4 फाइल करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा बदल; फ्रीलान्सर आणि छोट्या व्यावसायिकांना धक्का

ICC ODI Ranking : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पात्रतेसाठी चढाओढ; टीम इंडियासाठी महत्त्वाची बातमी... पाकिस्तानला धक्का, बांगलादेश पुन्हा ICC स्पर्धेला मुकणार

Latest Marathi News Live Update : वांगी खुर्द येथे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग

Leopard Rescue : विहिरीत पडलेल्या बिबट मादीला वनविभागाने केले रेस्क्यू

IPL 2026 Controversy : टीम डेव्हिडवर बंदीची कारवाई? RCB vs MI सामन्यात नको ते करून बसलाय... Viral Video ची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

SCROLL FOR NEXT